दिवसा ‘बुवाबाजी’ आणि रात्री ‘दुचाकी’ची चोरी करणारा गजाआड

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – मौज-मजा किंवा प्रेयसीचे लाड पुरवण्यासाठी दुचाकी किंवा घरफोडी केल्याचे ऐकले असेल मात्र, दिवसा लोकांना अंगात देव येतो असे सांगून लुटणाऱ्या आणि रात्री दुचाकी चोरणाऱ्या भोंदूबाबाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून १९ दुचाकी जप्त केल्या आहेत.

औरंगाबादच्या नारेगाव परिसरात राहणारा अशोक तामचीर (वय-२८) याला पोलिसांनी अटक केली आहे. अशोक हा लोकांना आपल्या अंगात देव येत असल्याची बतावणी करत होता. तसेच देव आपल्या अंगात आल्यानंतर कोणताही असाध्य रोग बरा करू शकतो असा दावा करून तो लोकांची लुबाडणूक करत होता. तो दिवसा अंगात देव आल्याचे सांगून लुटत होता तर रात्री दुचाकींची चोरी करीत होता.

चोरलेल्या दुचाकींची विक्री दोन ते तीन हजार रुपयांना विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तो भरवत असलेल्या दरबारातच छापा टाकला. तेथून पोलिसांनी नंबर प्लेट वरून पोलिसांनी तपास केला. त्यावेळी ९ दुचाकी चोरीच्या असल्याचे उघड झाले. गाड्या चोरी करण्यासाठी त्याचा एक भक्त आणि एक सहकारी देखील होता. त्यांच्या मदतीने तो रात्रीच्यावेळी दुचाकी चोरत होता. दिवसा भोंदूबाबा म्हणून लोकांना लुटत होता तर रात्री चोरलेल्या दुचाकी आर्थीक अडचण असल्याचे सांगून विकत होता. भोंदूबाबा बनून किती लोकांना त्याने फसवले आहे याचा तपास पोलीस करीत आहेत.

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या , कारण …

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

सारथी’ संस्थेच्या धर्तीवर OBC विद्यार्थ्यांसाठी तात्काळ संशोधन – प्रशिक्षण संस्था स्थापन करा-संभाजी ब्रिगेड