घाटकोपरमध्ये खून झालेल्या बबलू दूबेच्या साथीदाराला पिस्तूलासह बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – घाटकोपर येथे मे २०१९ मध्ये गोळ्या घालून बबलू दुबे याचा खून करण्यात आला होता. त्यानंतर आपल्यावरही कुणीतरी हल्ला करेल या भीतीने पिस्तूल बाळगणाऱ्या बबलू दुबेच्या साथीदाराला गुन्हे शाखेच्या युनीट १ च्या पथकाने अटक केली आहे.

रुपेश एकनाथ सातपुते (वय २४, रा. संजय गांधी नगर आंबेडकर चौक, पंतनगर घाटकोपर, मुंबई ) असे अटक कऱण्यात आलेल्याचे नाव आहे.त्याच्याकडून पोलिसांनी एक गावठी पिस्तूल आणि ३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनीट १ चे पथक समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनचोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंधक घालण्यासाठी गस्त घालत होते. त्यावेळी अजय थोरात यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक तरुण कमरेला पिस्तूल लावून रामोशी गेट चौकात पंडीत नेहरू रोडवर उभा आहे.

त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन सापळा रचला आणि सातपुते याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि ३ जिवंत काडतुसे असा ४० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बबलू दुबेच्या खुनानंतर भितीमुळे बाळगले पिस्तूल

सातपुते याचा साथीदार बबलू दुबे याचा मे महिन्यात घाटकोपर येथे गोळ्या घालून खून कऱण्यात आला होता. त्यानंतर भितीमुळे आपण हे पिस्तूल बाळगल्याचे त्याने सांगितले. त्याच्यावर विनयभंग, खुनाचा प्रयत्न, दरोडा, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला ठाणे जिल्हा व नवी मुंबई येथून २ वर्षांकरता तडीपार करण्यात आले आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आय़ुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आय़ुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनीट १ चे पोलीस निरीक्षक अरुण वायकर, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत शिंदे, कर्मचारी अजय थोरात, अमोल पवार, वैभव स्वामी, अनिल घाडगे, बाबा चव्हाण यांच्या पथकाने केली.

आरोग्य विषयक वृत्त –

वजन कमी करताना येणारा अशक्तपणा धोकादायक 

स्मरणशक्ती वाढविण्यासाठी करा ‘हे’ उपाय 

मणक्यातील वेदना हे असू शकते पॅरालिसिसचेही लक्षण

गाईच्या तुपात कॅन्सरशी लढण्याची ताकद, संशोधकांचा दावा 

Loading...
You might also like