१००० रुपयांची लाच घेणारा पुण्यातील पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पासपोर्ट व्हेरिफेकशन करण्यासाठी ३५०० रुपयांची मागणी करत १००० हजार रुपयांची लाच स्विकारताना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

नागनाथ नामदेव भालेराव( पोलीस शिपाई ‌भारती विद्‍यापीठ पोलीस स्‍टेशन,पुणे शहर आयुक्तालय (वर्ग ३)) असे पकडण्यात आलेल्य़ा पोलीस शिपायाचे नाव आहे. याप्रकरणी २७ वर्षीय व्यक्तीने तक्रार केली आहे.

तक्रारदार यांनी पासपोर्ट व्हेरिफिकेशन करण्यासाठी अर्ज केला होता. त्यांचे पासपोर्ट व्हेरिफिकेशन करून देण्यासाठी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस शिपाई नागनाथ भालेराव यांनी ३५०० हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तडजोडीअंती २ हजारांची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकड़े तक्रार केली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केल्यावर त्याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने सापळा रचून त्याला तक्रारदाराकडून १ हजार रुपये स्विकारताना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या आवारात रंगेहात पकडले.

एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याने लाच मागितल्यास त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक संदिप दिवाण यांनी केले आहे. पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधिक्षक प्रतिभा शेंडगे, उदय ढवणे, मुश्ताक खान, वैभव गोसावी आणि अभिजीत राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आरोग्य विषयक वृत्त –

मुतखड्याच्या असह्य वेदना टाळण्यासाठी घ्या ‘ही’ काळजी

जाणून घ्या “योगा” कधी करावा

लहान मुलांनाही शिकवा हि “योगासन” होतील फायदे

हृदयदोष असलेल्या मुलास नानावटीच्या डॉक्टरांकडून जीवदान