पोलीस चौकी समोरूनच महिलेची पर्स लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – धुळे शहरात चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून दररोज कुठे ना कुठे सोन साखळी चोरीच्या घटना घडत आहेत. आज शहर पोलीस चौकीसमोरूनच एका महिलेची पर्स चोरट्यांनी लंपास केली. चौकीसमोरच हा प्रकार घडल्याने पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक राहिला नसल्याची चर्चा शहरात आहे.

याप्रकरणी सोनल पवार (रा. विष्णु नगर) यांनी फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनल पवार या खरेदीसाठी जमनालाल बजाज रोडवरील पोलीस चौकी समोरील विक्रेत्याकडून वस्तू खरेदी करत होत्या. सायंकाळी या परिसरात गर्दी असल्याने याच गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेतला. सोनल पवार यांच्या पिशवीतील पर्स चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार त्यांच्या लक्षात येताच त्यांनी आरोडाओरडा केला. मात्र चोरटे गर्दीचा फायदा घेत पसार झाले.

सोनल पवार यांनी आझाद नगर पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. या घटनेत पवार यांचे रोख सहा हजार रुपये, एटीएम कार्ड, आधार कार्ड चोरीला गेले आहे. पुढील तपास आझाद नगर पोलीस करीत आहेत.

Loading...
You might also like