RJ : पोलिस कर्मचार्‍याचा विवाहितेवर बलात्कार, अश्लील व्हिडीओ बनवून केलं ब्लॅकमेल, FIR दाखल

अलवर : वृत्त संस्था – एका पोलीस कॉन्स्टेबलने 32 वर्षांच्या विवाहित महिलेशी वाईट कृत्य केले आणि आपल्या साथीदारांनाही ते करण्यास सांगितले. या रेपचे अनेक व्हिडिओ सुद्धा त्याने बनवले होते, जे वायरल करण्याची धमकी तो महिलेला देत होता. महिलेने तब्बल तीन महिने यातना भोगल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता तिला धक्के मारून पोलिसांनी बाहेर काढले. अखेर एसपींकडे तीने न्यायाची मागणी केली असता तक्रार दाखल झाली. हा खळबळजनक प्रकार राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील आहे.

32 वर्षांच्या विवाहितेवर बलात्कार करणारा अलवर जिल्ह्याच्या रैणी पोलीस ठाण्यातील आरोपी कॉन्स्टेबल संजय कुमार (28) यास पोलीस अधीक्षक तेजस्वनी गौतम यांनी मुख्यालयात हजर केले आहे. महिलेवरील अत्याचाराचे प्रकरण राजगढ ठाणे प्रमुख यांच्याकडे सोपवले आहे.

पोलीस ठाण्यातून धक्के मारून हकलले
रैणी पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल संजय कुमार (28) याने एका विवाहितेवर बलात्कार केला आणि महिलेला धमकी देऊन तो तिचे शारीरी शोषण करत होता. या प्रकरणाची माहिती महिलेच्या पतीला मिळाल्यानंतर त्याने रैणी पोलीस ठाण्यात रिपोर्ट दाखल करण्यासाठी प्रयत्न केला असता ती घेण्यात आली नाही. तसेच महिलेला धक्के देऊन बाहेर काढण्यात आले.

पीडित महिलेने नंतर दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले की, ती फिरण्यासाठी जात असे तेव्हा कॉन्स्टेबल संजयने तिचा पाठलाग करण्यास सुरूवात केली आणि तो तिला त्रास देऊ लागला. तो तिला धमकाऊ लागला. 3 महिन्यापूर्वी एक दिवस त्याने बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला आणि धमकी दिली की, कुणाला सांगितले तर बदनामी केली जाईल आणि व्हिडिओ वायरल केला जाईल. यांनतर तो सतत तिचे शोषण करत होता.

साथीदारांनीही ठेवले महिलेशी शारीरीक संबंध
एक दिवस तो अन्य एका साथीदाराला घेऊन आला आणि त्याच्यासोबत शारीरी संबंध ठेवण्यास महिलेला सांगितले. अशाप्रकारे सतत तिचे शोषण करण्यात आले. हे शोषण असह्य झाल्याने तिने आपल्या पतीला सर्व प्रकार सांगितला, यानंतर पोलीस ठाण्यात ते दोघे तकार देण्यासाठी गेले असता महिलेला धक्के मारून बाहेर काढण्यात आले.

यानंतर पीडित महिलेने आपल्या पतीसोबत एसपी अलवर तेजस्वनी गौतम यांची भेट घेतली आपली व्यथा सांगितली. यानंतर एसपींच्या निर्देशानंतर रैणी पोलीस ठाण्यात आरोपी पोलीस कॉन्स्टेबल संजय कुमारवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी संजय कुणार रैणी पोलीस ठाण्यात कम्प्यूटर ऑपरेटर पदावर तैनात आहे. या प्रकरणाचा तपास एसपी तेजस्वनी गौतम यांनी सीओ लक्ष्मणगढ यांच्याकडे सोपवला आहे.

एसपी तेजस्वनी गौतम यांनी सांगितले की, या गुन्ह्याचा तपास राजगढ एसएचओ यांच्याकडे दिला असून वेगळा उच्चस्तरीय तपास डीएसपी लक्ष्मणगढ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. गुन्हा दाखल न करणारे एसएचओ आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. दरम्यान, या प्रकरणात आरोपी कॉन्सटेबल संजय याचे साथीदार, ज्यांनी महिलेवर बलात्कार केला होता त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like