पोलिसच निघाला मंगळसूत्र चोर

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन

ज्याने चोर पकडायची तोच चोर निघाला तर … ? याच गोष्टीची प्रचिती औरंगाबादकरांना आली. राज्य राखीव दलातील एका पोलिस कर्मचाऱ्याने तब्बल तीन मंगळसूत्र हिसकावल्याचे समोर आले आहे. योगेश शिणगारे असे  मंगळसूत्र चोर पोलिस शिपायाचं नाव असून तो मूळचा  अकोल्याचा आहे.  त्याला सातारा पोलिसांनी अटक केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’36e9301e-cdfa-11e8-abef-97236f74d32e’]

सदर घटना रात्र नऊच्या सुमारास घडली आहे. औरंगाबादेत बीड बायपास रोडवर स्वामी समर्थ मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या महिलेचं मंगळसूत्र पोलिसाने चोरलं.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , २४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सातारा परिसरात राहणाऱ्या सुरेखा राजेंद्र ठाले या मंदिरात दर्शनासाठी जात होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोराने त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. याप्रकरणी त्याच दिवशी त्यांनी सातारा परिसरात गुन्हा दाखल केला.

४३९ शिक्षकांना दरमहा पगार घर बसल्या अदा करण्याची वेळ प्रशासनावर

परिसरात वाढत्या मंगळसूत्र चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे आणि पोलीस उपनिरीक्षक व्ही. ए. चव्हाण यांनी या प्रकरणी गांभीर्याने तपास सुरु केला. दरम्यान, आज पहाटे तपासातील काही पुराव्याच्या आधारे त्यांनी योगेश सुरेश शिनगारे याला ताब्यात घेतले. शिनगारे याची अधिक चौकशी केली असता त्याने ठाले यांचे मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली.

पोलिस निरीक्षक प्रेमसागर चांद्रमोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार , कर्जबाजारीपणा व जुगाराच्या नादापायी त्याने हा प्रकार केला आहे .  यापूर्वीही त्याने तीन मंगळसूत्र चोरल्याची कबुली  दिली आहे. मंगळसूत्र चोरुन तो सोनंतारण कर्ज घ्यायचा.सातारा पोलीस अधिक तपास करत आहेत.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b99ea4c6-cdfa-11e8-9123-338446985a5d’]