शिक्रापूरमध्ये फटाके वाजवत पोलिस निरीक्षकाचे स्वागत ! PI उमेश तावसकर यांनी घेतला पदभार

शिक्रापूर : शिरुर तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या शिक्रापूर पोलीस स्टेशनला दबंग अधिकाऱ्याची गरज होती. शिक्रापूर येथे यापूर्वी आपल्या कार्याचा वेगळाच ठसा उमटवून चर्चेत आलेले तत्कालीन दबंग सहाय्यक पोलीस निरीक्षक आता शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाले आहे . त्यांनी पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या कडून शिक्रापूर पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला असून त्यांचे आगमन होताच शिक्रापूर येथे फटाके वाजवत स्वागत करण्यात आले..

शिक्रापूर येथे २१ जून २०१८ रोजी सदाशिव शेलार हे पोलीस निरीक्षक पदी रुजू झाले होते, त्यानंतर त्यांनी कोरेगाव भीमा बंदोबस्त शांततेत पार पडून महाराष्ट्रभर वेगळा आदर्श निर्माण केला होता, त्यांनतर कोरोना महामारीचा काळ आल्याने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या होत्या त्यामुळे कार्यकाळ संपून देखील सदाशिव शेलार हे सदर ठिकाणी कार्यरत राहिले, मात्र त्यांच्या नतर शिक्रापूर येथे दबंग अधिकाऱ्याची गरज असताना अचानकपणे शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे काही वर्षांपूर्वी पोलीस स्टेशन मध्ये मुख्य अधिकारीसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाचा दर्जा असताना कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांचे नाव चर्चेत आले, यापूर्वी शिक्रापूर येथे कार्यरत असताना त्यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारी मोडून काढत, परिसरातील अवैध्य धंदे बंद करण्याचे मोठे काम केले, यावेळी पोलीस स्टेशन परिसरात राजकीय व्यक्तींचा होणारा हस्तक्षेप थांबवला आणि गावगुंडांवर जरब बसवीत गावातील गुंडगिरी मोडीत काढली होती, यावेळी उमेश तावसकर यांनी त्यांच्या कार्याचा वेगळाच ठसा उमटविला होता, तर उमेश तावसकर यांची पूर्वी शिक्रापूर येथून बदली झाली आणि पोलीस स्टेशनचा पदभार सोडून जात असताना एका राजकीय व्यक्तीने फटाके वाजविले होते, तर सध्या महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या होत असताना शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांची हवेली येथे बदली झाली आणि त्या रिक्त जागेवर उमेश तावसकर यांची नेमणूक शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे, नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे हजेरी लावून मावळते पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्याकडून पोलीस स्टेशनचा पदभार स्विकारला आहे, पोलीस स्टेशन मध्ये उमेश तावसकर यांची इंट्री होताना बाहेर कोणीतरी फटाके वाजविले गेले असल्याने त्यांचे चांगले स्वागत झाले असून त्यांच्या कार्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.