स्टंटगर्ल’ निघाली चोर, पोलीसांकडून शोध सुरु

दिवा (मुंबई) : वृत्तसंस्था

लोकलच्या दरवाजात उभं राहून स्टंटबाजी करणाऱ्या आणि लोकलमधून पडता पडता वाचलेल्या स्टंटगर्ल विरोधात अखेर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. पूजा भोसले असे या स्टंटगर्लचे नाव असून, ती सध्या फरार आहे. पूजा भोसले ही एक चोर असून ती सुधारगृहातून पळून गेली होती अशी पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f003bb83-c7e3-11e8-97b7-7b0c75c3cbf8′]

पूजा भोसले नावाची ही मुलगी सोमवारी लोकलच्या दरवाजात उभं राहून स्टंटबाजी करत होती. यावेळी ती हात निसटून लोकलच्या खाली पडत असताना सहप्रवाशांनी तिला वाचवलं. धक्कादायक बाब म्हणजे इतकं सगळं होऊनही तिची मुजोरी मात्र कायम असल्याचं समोर आलं होतं. या सगळ्यानंतर अखेर रेल्वे पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय.

[amazon_link asins=’B00P0IJLRA,B00ICCYF0E’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’068c7857-c7e4-11e8-9e91-633ac18aa06c’]

सध्या स्टंटगर्ल पूजा भोसले फरार असून तिचा फोनही बंद आहे. रेल्वे पोलिसांकडून तिचा कसून शोध सुरु आहे. दरम्यान, पूजा भोसलेवर दोन वर्षांपूर्वी चोरीचे गुन्हेही दाखल आहेत. त्यात ती बालसुधारगृहातही होती. मात्र तिथून ती पळून गेली आणि दिव्यात येऊन लपली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे रेल्वे पोलिसांसोबत मुंबई पोलिसही तिच्या मागावर असल्याचं समजतंय.

गुन्हेगारी वाढण्यास राजकीय हस्तक्षेप कारणीभूत : खासदार बारणे