धक्कादायक ! पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीची डोक्यात गोळी घालून आत्महत्या

गडचिरोली :  पोलीसनामा ऑनलाइन –  गडचिरोलीत पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मूलचेरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक धनराज शिरसाठ याच्या पत्नी संगिता शिरसाठ (वय-28) यांनी पतीच्या रिव्हॉल्वरमधून गुरुवारी (दि.7) दुपारी साडेबाराच्या सुमारास डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. जखमी अवस्थेत संगीता यांना चंद्रपूर येथे सरकारी रुग्णालयात दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अहेरी पोलीस उपविभागांतर्गत येणाऱ्या मूलचेरा पोलीस ठाण्यात धनराज शिरसाठ उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. पोलीस उपनिरीक्षक धरनाज शिरसाठ हे नक्षलविरोधी अभियान राबवून गुरुवारी मूलचेरा येथे परतले होते. त्यानंतर आई-वडिलांसह मौजा मूलचेरा येथे कामानिमित्त गेले होते. त्यावेळी पत्नी आणि दोन्ही मुले घरातच होती. दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान पत्नी संगिता यांनी राहत्या घरात स्वत:वर गोळी झाडली.

आईने गोळी झाडल्याचे पाहून मुलीने आरडाओरड केली. यानंतर पोलीस मदत केंद्र येते तैनात असणारे कर्मचारी व अधिकारी हे घटनास्थळी गेले असता जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी चंद्रपूरमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली असून त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
दरम्यान, संगीता हिच्या माहेरच्या लोकांनी मात्र, पती धनराज यांनीच तिच्यावर गोळी झाडली असून तशी माहिती घटनास्थळावर असलेल्या तिच्या मुलीनेच कळविल्याचे म्हणणे आहे. महिला कॉन्स्टेबलशी असलेल्या अनैतिक संबंधात अडथळा ठरल्यानेच पती फौजदार धनराज याने स्वत:जवळील सर्व्हीस रिव्हॉल्वरमधून गोळीबार केल्याचा आरोप संगीताचा भाऊ गणेश सपके याने केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.