आत्महत्या करणाऱ्या इसमाचे प्राण वाचविणाऱ्या ‘त्या’ जिगरबाज पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव

पुणे :पोलीसनामा ऑनलाईन  – साधारण रविवार रात्री ११ वाजताची वेळ…. हडपसर मार्शलला कंट्रोलचा एक इसम आत्महत्या करीत आहे असा फोन आला. असा फोन येताच पोलिस शिपाई ७४९३ कांबळे व पोलिस शिपाई ८७३४ चिपाडे हडपसर येथील भगवती हाउसेस भागात तात्काळ  पोहचले आणि त्यांनी आत्महत्या करणाऱ्या इसमाचे प्राण वाचवले. पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे त्या इसमाचा जीव वाचला. या दोन्ही पोलिसांवर अभिनंदनाचे वर्षाव होत आहेत.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2c34d49e-d079-11e8-bf96-2780baac53d8′]
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कौटुंबिक भांडणामुळे हडपसर येथील भगवती हाऊसेस भागात राहणारे  सुब्बा नायर आत्महत्या करीत आहे असा कॉल आला. त्यानंतर लगेचच कांबळे, चिपाडे नामक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तिथे  गेले असता सुब्बा नायर हे घराचा दरवाजा बंद करून  फॅनला गळफास लाऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होते. आतून दरवाजा बंद होता. लागलीच पोलिसांनी दरवाजा तोडला. तसेच आत नायर फॅनला लटकलेले दिसले ताबडतोब त्यांना खाली घेऊन चाकूच्या साह्याने त्यांच्या गळ्याभोवतीचा फास कापण्यात आला. आणि त्यांना उपचाराकरिता  १०८ अँबुलन्स ने ससून हॉस्पिटल येथे नातेवाईकांसोबत रवाना केले. हडपसर मार्शलच्या कार्यतत्पर ते मुळे नायर यांचा जीव वाचला. या दोन्ही पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
[amazon_link asins=’B019XSHB7O,B06Y5HD2T7′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3a308a97-d079-11e8-993e-ff55f0e69e46′]

भर वर्गात विद्यार्थ्यांसमोर मुख्याध्यापकाची हत्या