कोरेगाव पार्क येथील हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोरेगाव पार्क येथील तेजस्विनी इमारतीच्या टेरेसवर चालविल्या जाणाऱ्या बेकायदेशीर हुक्का पार्लरवर कोरेगाव पार्क पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी हुक्का पार्लर चालविणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हमजा रंगूनी व आरकिशीता जुला मलिक या दोघांविरोधात सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात, प्रतिबंक व पुरवठा व वितरण) अधिनियमानुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क लेन नं. सी येथे तेजस्विनी इमारतीच्या टेरेसवर हमजा शफिक रंगूनी नावाचा व्यक्ती हुक्का पार्लर अनधिकृतपणे चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कोरेगाव पार्क पोलिसांनी तेथे २० मे रोजी छापा घातला. त्यावेळी तेथे स्पॉट व पाईपच्या साह्याने हुक्का ओढत असताना काही तरुण मिळून आले. तर हे दोघे येथील कामगाराकरवी कोसळा पेटवून पेटते निखारे पॉटच्या चिलीमवर ठेवत असल्याचे दिसले. त्यामुळे आग लागून दुखापत होण्याची शक्यता होती. तर तेथे अग्निशमन यंत्रणाही नव्हती. त्यानंतर पोलिसांनी मालक व मॅनेजरवर गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बहाद्दरपुरे. पोलीस उपनिरीक्षक कल्याणी शिंदे, कर्मचारी दिनेश शिंदे, सागर जगताप, अमोल जाधव, महादेव धांडे, किरण बनसोडे यांच्या पथकाने केली.