प्रसंगावधान दाखवत महिला पोलिसाने वाचवले गरोदर महिलेचे प्राण 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन
पोलिसांच्या नावाने सतत ओरडण्याऱ्यावर चांगलीच चपराक बसली आहे. प्रसंगावधानता राखत एका ट्रेनमधून पडलेल्या गरोदर महिलेचे प्राण महिला पोलीस शिपाईने वाचवले आहे. या महिला पोलीस शिपाईचे नाव रुपाली मेजारी असे आहे.
सविस्तर वृत्त असे की, २६ सप्टेंबर रोजी जलद लोकलने प्रवास करणारी पुजा नावाची महिला वांद्रेदरम्यान चक्कर येऊन ट्रेनमधून खाली पडली. यावेळी त्याच ट्रेनमधून महिला पोलीस शिपाई रुपाली मेजारीही प्रवास करत होत्या. पुजा ट्रॅकवर पडल्याचं कळताच ट्रेनमधून उतरून त्या धावत बाजूच्या ट्रॅकवर पोहोचल्या. पुजाला ट्रॅकवरून सुरक्षित बाजूला करून रुपालीने रेल्वे पोलिसांना फोन करून मदतीची गुहार केली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8472edf1-c304-11e8-9a91-715cd46d949e’]
 रेल्वे पोलिसही वेळेचे महत्त्व समजून घटना स्थळी धाव घेतली. रुपाली यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानतेनं पुजाचे प्राण वाचले. रुपालीच्या या शौर्याबद्दल तिचे सर्वच स्तरावर  कौतुक होत आहे. पुजा चार महिन्यांची गर्भवती आहे. सध्या तिच्यावर भाभा रुग्णालयात उपचार चालू आहेत.
[amazon_link asins=’B0756Z53JN,B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9b755c29-c306-11e8-b941-85bc264c112e’]