मोदींच्या ‘त्या’ विधानावर ममता बॅनर्जींचा पलटवार : म्हणाल्या मोदी ‘एक्सपायरी बाबू’

कोलकाता : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राज्याच्या विकासात ममता बॅनर्जी स्पीड ब्रेकर ठरत आहेत अशी टीका नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जींवर केली होती. त्यावर ममता बॅनर्जींनीही मोदी दंगेखोर तसेच एक्सपायरी बाबू आहेत असे म्हणत पलटवार केला आहे. तसेच त्यांनी मोदींना खुल्या चर्चेचही आव्हान दिल आहे.

मोदींच्या वक्त्यव्याचा समाचार घेताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ‘भाजप हा धोखेबाज आणि दंगेखोरांचा पक्ष आहे. मला मोदींकडून देशभक्तीच्या प्रमाणपत्राची गरज नाही. तृणमुल काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात ४१ टक्के महिलांना तिकीटे देण्यात आली आहेत. ममता दिदींनी एक्सपायरी बाबू असा टोमणा मोदींना मारताना खुल्या चर्चेचे आव्हान दिले. मी मोदी नव्हे, मी खोटे बोलत नाही असेही त्या म्हणाल्या.

काय म्हणाले होते मोदी –

इतर राज्यांप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये गतीने विकास होऊ शकला नाही, याचं कारण पश्चिम बंगालमध्ये स्पीड ब्रेकर आहे ज्याला दीदी म्हणून ओळखलं जातं. त्यांना गरिबी हटवायची नाही. जर गरिबी संपली तर त्यांचं राजकारणही संपेल. त्यांना गरिबी पहायची आहे आणि यामुळे त्यांनी गरिबांसाठी सुरु असणारे विकास प्रकल्प थांबवले आहेत. मात्र, बंगालला स्पीड ब्रेकर दीदींच्या तावडीतू मुक्त करण्यासाठी भाजप बांधील आहे.