Birthday Special : कधी मद्याच्या आहरी गेली होती पुजा भट, वडिलांसोबत चर्चा करून सोडण्याचा निर्णय, ‘टॉप’लेस फोटोमुळं आली होती चर्चेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस पूजा भट आज आपला 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या शानदार अ‍ॅक्टीगनं पूजानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. तर दुसरीकडे वादात सापडल्यानं ती अनेकदा चर्चेत राहिली आहे. मॅगेझिन कवर पासून तर दारूच्या व्यसनापर्यंत पूजानं प्रत्येक गोष्टीवर खुलून भाष्य करत आली आहे. या सर्व प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

पूजाचा जन्म 24 फेब्रुवारी 1972 रोजी मुंबईत झाला आहे. पूजा एक बिंधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिनं मीडियासमोर मान्य केलं होतं की, तिला दारूचं व्यसन आहे. आता मात्र पूजानं दारूचं व्यसन सोडलं आहे. पूजा आपल्या चाहत्यांनाही दारूपासून दूर राहण्यासाठी स्पेशल मेसेज देत असते. तिनं दारूचं व्यसन सोडण्याचं श्रेय तिच्या वडिलांना दिलं आहे.

एका मुलाखतीत पूजा म्हणाली होती की, “मी दारूच्या व्यसनाशी झगडत होते. एकदा मला वडिलांचा कॉल आला. ते म्हणाले, आय लव यू बेटा. जर तुझंही माझ्यावर प्रेम असेल तर स्वत:वर प्रेम कर. कारण मी तुझ्या आतच वसतो. या फोननंतर मी दारू सोडण्याचा निर्णय घेतला.” 2016 मध्ये पूजाचं आणि वडिल महेश भट यांचं हे बोलणं झालं होतं. पूजानं आता दारू सोडून 3 वर्षांहून अधिक दिवस झाले आहेत.

90 च्या दशकात पूजा भट हिनं टॉपलेस होऊन बॉडी पेंटींग केली होती. त्या काळी असं करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. त्याकाळी आपल्या बोल्ड अंदाजामुळे तिनं खूप अटेंशनं घेतलं होतं. याशिवाय पूजा आणि महेश भट यांचा एक फोटो आहे जो आजही चर्चेत आहे. एका मॅगेझिनच्या कवरसाठी महेश आणि पूजा यांनी किस करताना शुट केलं होतं.

पूजाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर डॅडी या सिनेमातून पूजानं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. हा सिनेमा महेश भटनं बनवला होता. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा खास काही चालला नाही. दिल है की मानता नहीं हा सिनेमा पूजासाठी मैलाचा दगड ठरला. या सिनेमात आमिर खान आणि पूजा लिड रोलमध्ये होते. हा सिनेमा सुपरहिट झाला. पूजानंही आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली.