पूजा सावंतच्या साडीतील लुकची सोशलवर जोरदार ‘चर्चा’ ! (फोटो)

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  अभिनेत्री पूजा सावंत सध्या चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे तिचे फोटो आहेत. पूजाचे काही फोटो सध्या सोशलवर व्हायरल होत आहे. या फोटोंची खास बात अशी की, पूजानं साडी नेसली आहे.

पूजानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात तिचा आकर्षक लुक दिसत आहे. नेहमीच वेस्टर्न लुकमध्ये दिसणारी पूजा साडीमध्ये दिसत आहे. पूजाचा हा अवतार खूप सुंदर दिसत आहे आणि चाहत्यांना खूप आवडला आहे.

पूजाची एकेक पोज, अदा आणि तिची स्माईल पाहून चाहतेही तिच्यावर फिदा झाले आहेत. अनेकांनी लाईक आणि कमेंट करत तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. सध्या तिचे ह फोटो वेगानं व्हायरल होत आहेत.

पूजाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं क्षणभर वश्रांती या मल्टीस्टारर मराठी सिनेमातून तिनं करिअराल सुरुवात केली होती. तिनं अनेक मराठी सिनेमात काम केलं आहे. झकास, सतरंगी रे, पोश्टर बॉईज असे तिचे काही मराठी सिनेमे सांगता येतील. याशिवाय पूजानं बॉलिवूडमध्येदेखील काम केलं आहे. विद्युत जामवालसोबत जंगली या सिनेमात तिनं काम केलं आहे.