Poonam Pandey | पूनम पांडेने देखील राज कुंद्रावर केले होते गंभीर आरोप; Video व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Poonam Pandey News | सोमवारी रात्री उशीरा मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) अटक केली. पोर्नोग्राफी (Porn films case) प्रकरणात त्याला (Raj Kundra Arrested) अटक करण्यात आली. राज कुंद्रावर मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून पॉर्न चित्रपट तयार करून विकल्याचा आरोप आहे. राजविरूद्ध आपल्याकडे ठोस पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. राजने आपल्या एका नातलगासोबत मिळून एक कंपनी सुरू केली होती. ही कंपनी पॉर्न कंटेंटसाठी अनेक एजंटला कॉन्ट्रॅक्ट द्यायची, असा देखील आरोप आहे. आता या प्रकरणी आणखी धक्कादायक खुलासे होता आहेत. अशातच अभिनेत्री असणाऱ्या पूनम पांडेने सुद्धा (Poonam Pandey) राज कुंद्रावर (Raj Kundra) गंभीर आरोप केल्याचे समजते.

राज कुंद्राला (Raj Kundra ) अटक केल्यानंतर एकचं खळबळ उडाली. यानंतर अनेक माहिती समोर आलीय. राज कुंद्राच्या अटकेनंतर अभिनेत्री आणि मॉडेल असणाऱ्या पूनम पांडेचा एक व्हिडीओ सध्या प्रसार माध्यमावर प्रसारित होताना दिसत आहे. त्या व्हिडिओमध्ये पूनम पांडेने म्हटलं आहे, ‘मी या संधीचा फायदा घेत, आज पुन्हा एकदा माझ्या केसाला हायलाईट करू इच्छिते. मी 2019 मध्ये राज कुंद्राविरोधात बॉम्बे हायकोर्टात (मुंबई उच्च न्यायालयात) (High Court) तक्रार दाखल केली होती. फसवणूक आणि फोटोंचा गैरवापर केल्याचा यामध्ये आरोप केला होता. मला पोलीस आणि आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचं तिने सांगितलं आहे.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

या दरम्यान, पूनम पांडेने (Poonam Pandey) 2019 या वर्षी राज कुंद्रा (Raj Kundra) आणि त्याचा जोडीदार सौरभ कुशवाहवर (Saurabh Kushwaha) आपल्या फोटोंचा आणि व्हिडीओचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप केला होता. दरम्यान, आपल्या पेमेंटमध्येही घोटाळा केल्याचा आरोप पूनम पांडेने थेट बॉम्बे हायकोर्टात (Mumbai High Court) केला होता. परंतु, राज कुंद्रा आणि सौरभ कुशवाहने हे आरोप फेटाळून लावले होते. मुख्यतः म्हणजे आता राज कुंद्राच्या अटकेनंतर हे प्रकरण पुन्हा एकदा उफाळून वर आलं आहे.

Web Title :- poonam pandey accused shilpa shettys arrested husband raj kundra read more

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raj Kundra Arrested | अश्लिल चित्रपट प्रकाशित प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक

Uddhav Thackeray | कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाला साकडे

Porn apps Case | पॉर्न व्हिडीओ बनवून अपलोड केल्याप्रकरणी राज कुंद्रा आधी ‘या’ अभिनेत्रीला झाली होती अटक

Supreme Court | महाराष्ट्र सरकारला उपचाराचे दर ठरवण्याचा अधिकार नाही