सावधान ! ‘या’ खराब डाएटमुळेही बळावतो जीवघेण्या कॅन्सरचा धोका

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सध्या बदलेली जीवनशैली आणि असंतुलित आहारामुळे शारीरिक आणि मानसिक समस्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यासाठी प्रत्येकाने योग्य वेळीच सावध झाले पाहिजे. अशा जीवघेण्या आजाराचा धोका टाळायचा असेल तर संतुलित लाइफस्टाइल आणि हेल्दी डाएटचे सेवन केले पाहिजे. आनुवंशिकते मुळे, प्रदूषित वातावरणामुळे किंवा खराब लाइफस्टाइलमुळे कॅन्सर होतो असे नाही तर खराब डाएटमुळेही कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.

एका संशोधनात संशोधकांना असे आढळून आले आहे की, खराब डाएटमुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. २०१५ मध्ये अमेरिकेतील ८० हजारपेक्षा जास्त कॅन्सरचे नवीन रूग्ण आढळले. याचे कारण होते खराब डाएट. या संशोधनासाठी संशोधकांनी सात डाएटमध्ये समाविष्ट होणाऱ्या पदार्थांचा अभ्यास केला. यामध्ये अनेक लोक फळे, भाज्या, धान्य, आणि दूध यांसारख्या पदार्थांचे कमी प्रमाणात सेवन आणि शुगरचे प्रमाण जास्त असलेल्या प्रोसेस्ड मीट, रेड मीट आणि सोडा यांसारख्या पदार्थांचे जास्त सेवन करत असल्याचे दिसून आले.

यासंबंधी केलेल्या संशोधनातून असे दिसून आले की, धान्यांचे कमी प्रमाणात सेवन केल्यामुळे अमेरिकेमध्ये कॅन्सरचे सर्वात जास्त रूग्ण आढळून आले. या संशोधनामध्ये २०१३ ते २०१६ मध्ये अमेरिकेतील वयस्कर व्यक्तींच्या रोजच्या आहराचा अभ्यास करण्यात आला. हा डेटा नॅशनल हेल्थ अ‍ॅन्ड न्यूटिड्ढशन एग्जामिनेशन सर्वेमधून प्राप्त करण्यात आला होता. त्याचबरोबर या सर्वेसाठी २०१५ मध्ये यूएस सेंटर्स फॉर कंटड्ढोल अ‍ॅन्ड प्रिवेंशनपासून नॅशनल कॅन्सरच्या घटनाबाबत डेटाचाही समावेश केला होता.

या संशोधनामध्ये मागील संशोधनांच्या उलट काही परिणाम दिसून आले. मागील संशोधनांमध्ये प्रोसस्ड मीटचे जास्त सेवन केल्याने कोलन कॅन्सरचा धोका जास्त असतो. पण तेच जर कडधान्य आणि धान्यांचा आहारात समावेश केला तर हा धोका कमी होतो. संशोधकांना या संशोधनातून असे आढळून आले की, कोलोन आणि रॅक्टल कॅन्सरमध्ये डाएट संदर्भातील प्रकरणांची संख्या आणि सरासरी ३८.३ टक्के होता. डाएटला मुख्यबिंदु ठरवून परिणामांचे पुनरावलोकन केले तेव्हा असे आढळले की, धान्य आणि दूधापासून तयार केलेल्या पदार्थांचे कमी सेवन आणि प्रोसेस्ड मीट प्रॉडक्ट्सच्या अत्याधिक सेवनाने कॅन्सरचा धोका वाढतो. वाढत्या वयानुसार, डाएट आणि कॅन्सरच्या धोक्यामध्ये कसा बदल घडून येतो आणि येत असेल तरी कितपत ? यावर मात्र या संशोधनात प्रकाश टाकण्यात आलेला नाही.