खळबळजनक ! बहिणीच्या मुलीलाच मावशीनं दाखवला पॉर्न व्हिडीओ, पुण्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या बहिणीच्या मुलीला तिच्या प्रियकराच्या मदतीने जबरदस्ती पॉर्न व्हिडीओ दाखवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील कोंढवा परिसरात समोर आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी मावशीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी मावशीला व तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात पीडित अल्पवयीन मुलीला तिच्या आईने आपल्या बहिणीकडे राहण्यास सोडले होते. त्यावेळी आरोपी महिलेचा प्रियकर हा घरी ये जा करीत असे. तेव्हा या दोघांनी पीडितेला जबरदस्तीने पॉर्न व्हिडीओ दाखवले. लॉकडाऊन असल्याच्या कारणावरुन बाहेर पडत येत नसल्याने कुणाला काय सांगायचं हा प्रश्न पीडितेला पडला.

त्यामुळे आरोपी मावशी आणि तिच्या प्रियकराने तिच्यावर सातत्याने अत्याचार केले. काही दिवसानंतर जेव्हा मुलगी आपल्या घरी परतली तेव्हा घडलेली सगळी हकीकत आपल्या आईस सांगितली. त्यानंतर पीडित मुलीला घेऊन या महिलेने पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली.

दरम्यान, आरोपी महिलेला व तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केल्यानंतर खाक्या दाखवताच गुन्हा कबूल केला. तर खबरदारीचा उपाय म्हणून दोघांची कोरोना चाचणी केली असता दोघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उपचारानंतर त्यांना तुरुंगात पाठवण्यात येणार आहे. मुलीसोबत बहिणीनेच असभ्य पातळीचे वर्तन केल्याने पीडितेच्या कुटूंबात तीव्र संताप आहे. कुटुंबीयांनी मावशीला कडक शिक्षा देण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.