‘रिसेप्शनिस्ट’ला त्यानं WhatsApp वर ‘अश्लील’ व्हिडिओ पाठवला, पोलिसांकडून मिळाली ‘ही’ शिक्षा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महिलेला अश्लील व्हिडीओ पाठवून शिवीगाळ करणाऱ्याला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. गिरगाव परिसरात एका डॉक्टरकडे ३७ वर्षीय महिला रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते. १३ नोव्हेंबरला सायंकाळी तिच्या वॉट्सअ‍ॅपवर एका अज्ञात मोबाइलधारकाने अश्लील व्हिडीओ पाठविला. त्यानंतर महिलेने कोण आहे अशी विचारणा केली असता समोरच्याने शिव्या दिल्या.

डीबी मार्ग पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार महिलेने दाखल केली. पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३५४ (अ), ५०४, ५०६ आणि माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६७ (अ) अन्वये अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून घेतला. त्यानंतर गुन्हे शाखा २ ने तांत्रिक मदत घेऊन गुन्हेगाराचा तपास सुरु केला. यानंतर पोलिसांनी १४ नोव्हेंबरला १९ वर्षीय तरुणास कामाठीपुरा परिसरातून ताब्यात घेतले. यावेळी तरुणाच्या फोनची तपासणी केली असता त्यामध्ये पाठवलेले सर्व अश्लील मेसेजेस आढळून आले.

आरोपी आणि डॉक्टरकडे रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत असलेल्या महिला एकाच ग्रुपमध्ये ऍड होत्या त्यामुळे तरुणाने तेथून महिलेचा नंबर मिळवला आणि तिला मेसेज केले असल्याचे सांगितले. तरुण याच परिसरातील एका मिडिकलमध्ये डिलिव्हरी बॉयचे काम करत होता. आरोपीने महिलेला स्वतःचे अश्लील व्हिडीओ पाठवले होते.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like