Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये 333 रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला 8.22 लाख रुपये मिळतील, जाणून घ्या कसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Post Office Scheme | पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला बँके पेक्षा जास्त रिटर्न मिळतो. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर अनेक फायदे व विमा लाभ देखील मिळतो. याशिवाय, काही वर्षांत, तुम्हाला अधिक निधी देखील मिळेल. तुम्हीही या (Post Office Scheme) योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी इथे एक अशी योजना आहे, जी तुम्हाला कमी गुंतवणुकीत पाच वर्षांत 8 लाखांपेक्षा जास्त रक्कम देईल. चला जाणून घेऊया पोस्ट ऑफिसच्या या खास योजनेबद्दल.

काय आहे हि पोस्ट ऑफिस स्कीम ?

पोस्ट ऑफिस हि योजना Senior Citizen Savings Scheme (SCSS) आहे. त्यावर 7.4 टक्के वार्षिक व्याज आहे, जे 31 मार्च/30 सप्टेंबर/31 डिसेंबर ठेवीच्या तारखेपासून देय आणि त्यानंतर 31 मार्च, 30 जून, 30सप्टेंबर आणि 31 डिसेंबर रोजी व्याज देय असेल. ही योजना 5 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधी सह येते. तुम्ही यामध्ये किमान रु 1000 गुंतवू शकता, तसेच तुम्ही जास्तीत जास्त रु 15 लाख रुपये हि गुंतवू शकता. त्यात एकरकमी ठेव गुंतवावी लागते. या योजनेअंतर्गत, इनकम टॅक्स कायदा 80C अंतर्गत व्याजात सूट दिली जाते.

हे लोक खाते उघडू शकतात.

या योजनेंतर्गत (Post Office Scheme), ज्यांचे वय 50 ते 60 दरम्यान आहे असा कोणताही भारतीय नागरिक खाते उघडू शकतो किंवा त्यापेक्षा कमी वयाचे लोकही त्याअंतर्गत खाते उघडू शकतात. यामध्ये सिंगल खाते तसेच जॉईन खाते उघडण्याचा पर्याय आहे. एका खात्यात जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. जॉईन खात्यात जमा केलेली संपूर्ण रक्कम फक्त पहिल्या खातेदारालाच दिली जाईल.

या योजनेवर व्याज.

व्याज हे त्रैमासिक आधारावर दिले जाते आणि ते जमा केल्याच्या तारखेपासून 31 मार्च/30 जून/30 सप्टेंबर/31 डिसेंबरपर्यंत लागू आहे. दर तीन महिन्याला देय असलेले व्याज खातेदाराने दावा केला नसेल, तर अशा व्याजावर कोणतेही अतिरिक्त व्याज मिळणार नाही.

खाते बंद झाल्यावर..

हे खाते उघडल्यानंतर कधीही बंद केले जाऊ शकते. 1 वर्षापूर्वी खाते बंद केल्यास कोणतेही व्याज दिले जाणार नाही आणि खात्यात कोणतेही व्याज भरल्यास ते मुद्दलाकडून वसूल केले जाईल. खाते उघडल्यापासून 1 वर्षानंतर ते 2 वर्षाआधी बंद केले जाते. तर मूळ रकमेतून 1.5% इतकी रक्कम वजा केली जाईल. खाते उघडल्या नंतरच्या तारखेपासून 2 वर्षांनंतर व 5 वर्षाच्या आधी बंद केले जाते. तर मूळ रकमेतून 1% इतकी रक्कम वजा केली जाईल. खातेधारकाचा मृत्यू झाल्यास, खात्यावर मृत्यूच्या तारखेपासून पीओ बचत खात्याच्या दराने व्याज मिळेल.

8.22 लाख रुपये कसे मिळवायचे?

जर एखाद्या सीनियर सिटीजन 334 रुपयांच्या रोजच्या बचतीसह या योजनेत दरमहा 10,000 रुपयांची बचत करत असेल तर एका वर्षात त्याच्याकडे एकूण 1,20,000 रुपये जमा होतील.
म्हणजेच पाच वर्षांत त्याच्याकडे 600,000 लाख रुपये असतील.
तसेच तुम्ही या योजनेत एकरकमी 6 लाखांची गुंतवणूक करू शकता.
यानंतर तुम्हाला पाच वर्षांच्या मॅच्युरिटीवर 8.22 लाख रुपये मिळतील.
ज्यामध्ये एकूण व्याज रिटर्न 2,22,000 रुपये असेल.

Web Title : Post Office Scheme | an investment of rs 333 in this scheme of
post office will give you an amount of rs 8 lakh 22 thousand

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्चPune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी ! पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्याSupreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे, ‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये; सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात