Power Crisis In Maharashtra | चिंताजनक ! महाराष्ट्रावर कोळसा टंचाईचे संकट ‘गडद’, कोळशाअभावी वीजनिर्मिती केंद्रांतील 13 संच बंद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Power Crisis In Maharashtra | कोळशाच्या टंचाईमुळे महावितरणला (MSEDCL) वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील (Power Crisis In Maharashtra) 13 संच सद्यस्थितीत बंद पडले आहेत. त्यामुळे तब्बल 3330 मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प पडला आहे. विजेची ही तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीजखरेदीसह जलविद्युत (Hydropower) व अन्य स्त्रोतांकडून वीजपुरवठा (Power supply) उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु आहे. राज्यात विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरु असून वीजग्राहकांनी मागणी व उपलब्धता यामध्ये समतोल राखण्यासाठी सकाळी 6 ते 10 व सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत विजेचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

 

कोळशाअभावी 13 संच बंद
देशभरात कोळसाटंचाई निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून औष्णिक वीजनिर्मिती कोळशाअभावी हळूहळू कमी होत आहे. त्यातच महावितरणला ((maharashtra state electricity distribution co. ltd)) वीजपुरवठा करणाऱ्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील 13 संच कोळशाअभावी सध्या बंद पडले आहेत. यात महानिर्मितीचे चंद्रपूर (Chandrapur), भुसावळ (Bhusawal) व नाशिक (Nashik) प्रत्येकी 210 मेगावॅटचे तसेच पारस- 250 मेगावॅट आणि भुसावळ व चंद्रपूर येथील 500 मेगावॅटचा प्रत्येकी एक संच बंद झाला आहे. यासोबतच पोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडचे Postal Gujarat Power Limited (गुजरात) 540 मेगावॅटचे चार संच आणि रतन इंडिया पॉवर लिमिटेडचे Ratan India Power Limited (अमरावती) 810 मेगावॅटचे तीन संच बंद आहेत. यामुळे महावितरणला औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमधून कराराप्रमाणे मिळणाऱ्या विजेमध्ये घट होत आहे. (Power Crisis In Maharashtra)

खुल्या बाजारातून वीज खरेदी
विजेच्या मागणी व उपलब्धता यामधील सध्या 3330 मेगावॅटची तूट भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून (पॉवर एक्सचेंज) वीज खरेदी सुरु आहे. देशभरात विजेची मागणी वाढल्यामुळे वीज खरेदीचे दर महाग होत आहे. खुल्या बाजारातून 700 मेगावॅट विजेची खरेदी 13 रुपये 60 पैसे प्रतियुनिट दराने करण्यात येत आहे. तर रविवारी (दि.10) सकाळी रियल टाईम व्यवहारातून 900 मेगावॅट विजेची 6 रुपये 23 पैसे प्रतियुनिट दराने खरेदी करण्यात आली. यासोबतच कोयना धरण (Koyna Dam) तसेच इतर लघु जलविद्युत निर्मिती केंद्र (Small Hydropower Plant) आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीज उपलब्ध करण्यात येत आहे.

 

कोळसा टंचाईचे सावट गडद
कोळसा टंचाईचे सावट गडद होत असतानाच राज्यात उष्मा वाढल्यामुळे विजेची मागणी देखील वाढली आहे. राज्यात (मुंबई वगळून) शनिवारी (दि.9) 17,289 मेगावॅट विजेची मागणीप्रमाणे महावितरणकडून पुरवठा करण्यात आला. तर गेल्या 24 तासांमध्ये राज्याच्या काही भागात पाऊस झाल्यामुळे आज विजेच्या मागणीत घट झाली. आज, रविवारी सकाळी 11.30 वाजता राज्यात 18,200 मेगावॅट तर महावितरणच्या कार्यक्षेत्रात 15 हजार 800 मेगावॅट विजेची मागणी होती. विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार कृषिवाहिन्यांवर दररोज 8 तास दिवसा किंवा रात्री चक्राकार पद्धतीने थ्री फेज वीजपुरवठा (Power Crisis In Maharashtra) करण्यात येत आहे.

विजेचा वापर अतिशय काटकसरीने करावा
कोळसा टंचाईमुळे विजेचा तुटवडा वाढण्याची शक्यता अधिक असल्याने मागणी व पुरवठा यात समतोल ठेवण्यासाठी
वीजग्राहकांनी सकाळी 6 ते 10 आणि सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेदरम्यान विजेचा वापर अतिशय काटकसरीने करावा
असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. विजेची सर्वाधिक मागणी असणाऱ्या कालावधीत विजेचा वापर कमी
झाल्यास मागणी व उपलब्धता यातील तूट कमी होईल व भारनियमन करण्याची गरज भासणार नाही.

 

Web Title :- Power Crisis In Maharashtra | Worrying! Coal shortage crisis dark in Maharashtra, 13 power plants shut down due to lack of coal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BJP MLA Gopichand Padalkar | ‘रोखठोक’ वरून पडळकरांचा निशाणा, म्हणाले – ‘संजय राऊत यांनी शिवसेनेचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याचा विडा उचललेला दिसतोय’

Sanjay Raut | ‘प्रियंका गांधी यांच्यात दिवंगत इंदिरा गांधी यांची झलक दिसते’ – शिवसेना खासदार संजय राऊत

Index Testing In HIV | नागाव सेंट्रल आणि स्पेशल जेलमध्ये 85 कैदी HIV पॉझिटिव्ह आढळले, नशेच्या व्यसनामुळे झाले संक्रमित