दिवसा ‘स्वस्त’अन् रात्री ‘महाग’ होणार वीज, PMO नं दिली मंजुरी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता एकाच दिवसात वीजेच्या वापरासाठी वेगवगळा दर आकारला जाणार आहे. सकाळी, दुपारी आणि रात्री विजेचा दर वेगवेगळा असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऊर्जा मंत्रालयाच्या टाईम ऑफ डे टॅरिफ प्रस्तावाला मोदी सरकारनं ग्रीन सिग्नल दिला आहे. हा प्रस्ताव दोन महिन्यात लागू करण्याच्या प्लॅनिंगसाठी निर्देशही देण्यात आले आहेत. एकाच दिवसात वीजेचे अनेक दर निश्चित केले जाण्याची शक्यता आहे. डीमांड आणि सप्लायनुसार सकाळी, दुपारी आणि रात्री विजेचे दर वेगवेगळे असणार आहेत.

ग्राहकांना होणार फायदा
पावर अँड रिन्युएबल एनर्जी सेक्टर संबधित इंफ्रास्ट्रक्चरची एक समीक्षा बैठक झाली. त्याच बैठकीत या मुद्द्यावर निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रस्ताव सर्व सेक्टरमधील (इंडस्ट्रीयल आणि डोमेस्टीक) लोकांसाठी लागू केला जाणार आहे. हा प्रस्ताव कशा प्रकारे लागू केला जाईल यासाठी राज्यांसोबत सहमती बनवली जावी असं ऊर्जा मंत्रालयाला सांगण्यात आलं आहे. यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

टारगेट पूर्ण करणाऱ्या राज्यांना इन्सेंटीव मिळण्याची शक्यता, लागू न केल्यास मात्र…
आता जे टॅरिफ आहेत त्यात कोणतीही वाढ होऊ नये याचीही काळजी घेण्यात आली आहे. सोलर एनर्जी जास्त प्रमाणात उपलब्ध असल्यानं दिवसा तर ग्राहकांना फायदा मिळेल. जे राज्य हा नवीन प्रस्ताव लागू करणार आहेत त्यांना अनेक प्रकारचे इन्सेंटीव दिले जाणार आहेत. जे राज्य हा प्रस्ताव लागू करणार नाहीत त्यांना केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या मदतीत कपात केली जाणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा –