‘जनधन’चं ATM येईल संकटसमयी कामी, मोदी सरकार देतंय ‘या’ सुविधा ‘एकदम’ फ्री, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना व्हायरसमुळे या लॉकडाऊनच्या काळात सामान्य जनतेला आर्थिक संकटाचा सामना करता यावा याकरिता मोदी सरकार नागरिकांच्या जनधन खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करत आहे. हे खाते उघडल्यानंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा फायदा मिळू शकतो.

जन – धन योजना 2020चे हे आहेत फायदे

  पीएम जनधन योजना 2020 अंतर्गत जर तुम्ही खाते उघडले असेल तर 1 लाखापर्यंतचा अपघात विमा मोफत मिळतो.

  बरोबरच 30 हजार रुपयांंचा जीवन विमा मिळतो.

३० हजार रुपयांचा विमा जनधन खात्याबरोबर मिळणाऱ्या रुपे डेबिट कार्ड (Rupay Debit Card) वर मिळेल.

  लाभार्थीच्या मृत्यूनंतर याची रक्कम मिळते.

 – यासाठी काही नियम व अटींचे पालन करणे गरजेचे आहे.

या विम्याचा प्रीमियम नॅशनल पेमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडियाकडून (NPCI) केले जाते.

क्लेम मिळवण्यासाठी या आहेत अटी

जनधन योजनेअंतर्गत व्यक्तिगत अपघात विम्यासाठी क्लेम तेव्हाच मिळेल जेव्हा रुपे कार्डधारक कोणत्याही बँकेच्या शाखेत, बँक मित्र, एटीएम, पीओएस, ई-कॉम इत्यादी चॅनेलवर कमीतकमी एक सफल वित्तीय व्यवहार किंवा गैर-वित्तीय व्यवहार आपल्या स्वत:च्या बँकेतून किंवा/आणि दुसऱ्या बँकेतून दुर्घटना तारीख नोंदवेल. त्यानंतर 90 दिवसांमध्ये क्लेम मिळेल.

त्याचप्रमाणे ग्राहकांना अन्य बँकांप्रमाणेच रुपे डेबिट कार्ड आणि ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते. प्रति परिवार खासकरून कुटुंबांतील महिलेच्या खात्यामध्ये 10,000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल. ग्राहकांना किमान शिल्लक रक्कम (Minimum Balance) ठेवण्याचीही आवश्यकता नसते.

कसं आणि कुठे उघडाल जनधन खाते?

जवळच्या कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन तुम्ही जनधन खाते उघडू शकता.

बँक मित्रच्या साहाय्याने देखील जनधन खाते उघडण्याचा पर्याय आहे.

या करता ग्राहकांना किमान शिल्लक रक्कम (Minimum Balance) ठेवण्याचीही आवश्यकता नसते.

जनधन खाते उघडण्यासाठी केवायसी (Know Your Customer) डिटेल्स पूर्ण करणे आवश्यक आहे.