मोठी बातमी ! ‘या’ कारणामुळं 1.20 लाख शेतकऱ्यांकडून परत घेतले 6 हजार रुपये, चुकूनही करू नका ‘हे’ काम, जाणून घ्या

नवीदिल्ली – वृत्तसंस्था : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेनुसार 6 हजारांचा लाभ मिळवण्यासाठी काही लोक गडबड करत असल्याचे उघडकीस आले आहे. अशा प्रकारे लाभ मिळवणाऱ्या 1 लाख 19 हजार 743 लोकांकडून नुकतेच सरकारने पैसे परत घेतले आहेत. लाभार्थींनी दिलेली नावे आणि बँक खात्याची माहिती यामध्ये बरीच तफावत आढळून आली आहे. म्हणजेच बँक खाते धारकाचे नाव आणि जमीन मालकाचे नाव यात तफावत आढळून आल्याने पैसे परत घेण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या खात्यामध्ये व्हेरिफिकेशन न करता पैसे टाकण्यात आल्याचे कृषी मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते.

केंद्र सरकारकडून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाहीत. कारण केंद्र आधी राज्याकडे हा पैसा पाठवते आणि मग राज्य सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात हा पैसे जमा करते. मिळालेल्या माहितीनुसार व्हेरिफिकेशन करण्याआधी 1.19 लाख बँक खात्यामध्ये 2 हजार रुपये जमा करण्यात आले होते. परंतु पडताळणी केली असता याबाबतची माहिती मिळाली. त्यामुळे आता जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला असेल तर तुमचे पैसे परत घेतले जाऊ शकतात.

अशा प्रकारे परत घेतले जातात पैसे
केंद्र सरकारने या आधीच राज्य सरकारला विचारले होते की, अपात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला तर पैसे परत कसे मिळवणार ? मात्र आता हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर (डीबीटी) च्या माध्यमातून परत मिळवले जातील. बँक हे पैसे वेगळ्या खात्यात टाकून राज्य सरकारला परत करेल. अपात्रांकडून पैसे घेऊन राज्य सरकार https://bharatkosh.gov.in/ मध्ये जमा करणार आणि पुढील लाभ मिळण्याआधी त्या यादीतून शेतकऱ्यांचे नाव काढण्यात येईल.

कोणाला लाभ मिळणार आणि कोणाला मिळणार नाही
या योजनेसाठी काही लोकांना अटी लागू केलेल्या आहेत जर अशा लोकांनी काही गडबड केली तर आधार व्हेरीफिकेशमध्ये त्याबाबत माहिती मिळणार आहे. सगळे 14.5 कोटी शेतकरी कुटुंब यासाठी पात्र आहेत. 1 फेब्रुवारी 2019 पर्यंत जमीन रेकॉर्डमध्ये असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

खासदार, आमदार, मंत्री आणि महापौर यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.

मल्टी टास्किंग स्टाफ/चतुर्थ श्रेणी/समूह डी कर्मचाऱ्यांना सोडून केंद्र किंवा राज्य सरकारमधील कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला लाभ मिळणार नाही. जर अशा लोकांनी लाभ मिळवला तर आधार आपोआप याबाबत माहिती देईल.

डॉक्टर, इंजीनियर, सीए, वकील, आर्किटेक्ट शेती देखील करत असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. आयकर भरणाऱ्या आणि 10 हजरांपेक्षा अधिक पेन्शन मिळवणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही.

शेतकऱ्यांसाठी महत्वाची योजना
शेतीच्या विकासासाठी बनविलेली ही सर्वात महत्त्वाची योजना आहे. मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात 24 फेब्रुवारी 2019 रोजी गोरखपूर-यूपीमधून औपचारिक सुरुवात केली होती. त्याअंतर्गत आता चौथा हप्ता देखील मिळू लागला आहे.या संदर्भातील चौथ्या हफ्ता देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यातही पोहचला आहे. तर आत्तापर्यंत 8,46,14,987 शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/