महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये सरकार जमा करतंय 2.20 लाख रूपये ? जाणून घ्या ‘सत्य’

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – केंद्र सरकार ‘प्रधानमंत्री नारी शक्ती योजने’ अंतर्गत सर्व महिलांच्या बँक खात्यात 2 लाख 20 हजार रुपये जमा करीत असल्याचा दावा करणारा व्हिडीओ प्लॅटफॉर्म यूट्यूबवर या दिवसात जोरदार व्हायरल होत आहे. जर असा एखादा मेसेज तुमच्याकडे आला असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. जेव्हा केंद्र सरकारचे अधिकृत ट्विटर हँडल पीआयबी (प्रेस इन्फर्मेशन ब्यूरो) फॅक्ट चेकने या दाव्याचा आणि व्हायरल व्हिडिओचा तपास केला तेव्हा सत्य बाहेर आले. पीआयबीने सांगितले की, हा व्हॉईस मेसेज बनावट आहे.

पीआयबी फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर आले – पीआयबी फॅक्ट चेक अनेकदा ट्विटर हँडलद्वारे सोशल मीडियावर व्हायरल बनावट बातम्यांचे सत्य समोर आणते आणि सामान्य लोकांना जागरूक करते. तसेच या व्हिडिओच्या तपासणीत असे दिसून आले आहे की, केंद्र सरकारने अशी कोणतीही योजना सुरू केलेली नाही.

पीआयबीने या कार्याबद्दल सांगितले आहे- पीआयबीचे म्हणणे आहे की, तुम्हाला जर कोणताही मेसेज संदेश मिळाला आणि त्यातील एखाद्या लिंक क्लिक करण्यास सांगितले तर प्रथम त्या मेसेजची विश्वासार्हता प्रथम तपासा, त्यावर त्वरित विश्वास ठेवू नका. पीआयबीच्या मते, जर आपण चुकून एखाद्या बनावट मेसेजवर क्लिक केले तर तो आपल्यासोबत ऑनलाइन फ्रॉड असू शकतो.

पीआयबी फॅक्ट चेक म्हणजे काय – पीआयबी फॅक्ट चेक केंद्र सरकारच्या पॉलिसी / योजना / विभाग / मंत्रालयांविषयी चुकीची माहिती रोखण्यासाठी कार्य करते. सरकारशी संबंधित कोणतीही बातमी सत्य आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकची मदत घेतली जाऊ शकते. कोणत्याही पीआयबी फॅक्ट चेकला संशयास्पद बातमीचा स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा यूआरएल व्हाट्सएप नंबर 918799711259 वर पाठवू शकता किंवा [email protected] वर मेल करू शकता.