सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा ‘ओपन’ करा, आ. बच्चू कडूंच्या मागणीनं अनेकांना फुटला ‘घाम’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर सिंचन घोटाळा प्रकरणाविषयी पुन्हा चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर आता सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा ओपन करा करा, अशी मागणी प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. बच्चू कडू यांनी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे.

सिंचन घोटाळा प्रकरणाविषयी माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, ‘मधल्या काळात सिंचन घोटाळ्याच्या फाईल बंद झाल्या. या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे. सिंचनाची अवस्था विदर्भ मराठवाड्यात खराबच आहे. मराठवाडा-विदर्भात सिंचनाचा अनुशेष कमी झालेला नाही.’

त्यासोबतच पुढचे सहा महिने मंत्री, आमदार, आणि वर्ग एकच्या अधिकाऱ्यांना पगार देऊ नका. ती मदत शेतकऱ्यांना द्या अशीही मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.

काय आहे सिंचन घोटाळा
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात सिंचन क्षेत्रात सुमारे 35 हजार कोटी रुपये खर्चाबाबत अनियमितता पुढे आली होती. याप्रकरणी आधीपासूनच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चौकशी सुरू होती. एसीबीने अजित पवार आणि माजी मंत्री सुनील तटकरे यांचीही चौकशी केली होती. सिंचन घोटाळ्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अजित पवार यांनी जलसंपदा मंत्री असताना नियमबाह्यरित्या विविध प्रकल्पांच्या 20 हजार कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली, असाही आरोप झाला होता.

Visit : Policenama.com