Prakash Ambedkar | प्रकाश आंबेडकरांची अशोक चव्हाणांना थेट धमकी?; म्हणाले – ‘बायको-सासुबरोबर जेलमध्ये जायचं का?’

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – Prakash Ambedkar | देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीनिमित्त (Deglur Assembly by-election) वंचित आघाडीच्या वतीने प्रचार सभा आयोजित केली होती. या दरम्यान वंचित बहुजन विकास आघाडीचे (bahujan vikas aghadi) सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना थेट धमकीच दिली आहे. ‘बायको सासुबरोबर जेलमध्ये जायचं का ते ठरवा’ असं प्रकाश आंबेडकर यांनी अशोक चव्हाणांवर थेट निशाणा साधला आहे.

‘आदर्श प्रकरण पुन्हा काढायचे का? अशी धमकीच प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उघडपणे अशोक चव्हाणांना (Ashok Chavan) दिली आहे. एक मोर्चा हायकोर्टावर गेला की, तुम्ही दडवलेली फाईल पुन्हा बाहेर येईल आणि सुशीलकुमार शिंदे यांना देखील जेलमध्ये घेऊन जाईल, असा इशारा देखील प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले की, ‘अशोकराव बोलले वंचितच्या गाडीत पेट्रोल भाजप भरते. अशोकराव, ही चूक आयुष्यात पुन्हा कधी करू नका. निवडणूक होऊ द्या, आमच्या गाडीमध्ये कुणी-कुणी पेट्रोल भरलं हे राहु द्या, आम्ही हायकोर्टात विचारतो आदर्श प्रकरणात कुणाकुणाचा फ्लॅट आहे. अशोक चव्हाण आपणाला बायको आणि सासुबरोबर जेलमध्ये जायचं का ते ठरवा? अशा कडक शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी अशोक चव्हाणांवर घणाघात केला आहे.

हे देखील वाचा

Aryan Khan Drug Case | भाजपा नेत्याचा मोठा दावा ! प्रभाकर साईलनं समीर वानखेडेंवर पैसे घेतल्याचा खोटा आरोप केला? पहा ‘स्टिंग ऑपरेशन’चा व्हिडीओ

Pune Corporation GB | नदीकाठ सुधार योजनेचे 3 टप्प्यांचे काम होणार पीपीपी तत्वावर; 700 कोटी रुपयांचे एका टप्प्याचे काम पालिका निधीतून तर उर्वरित 2 टप्पे ‘पीपीपी’मधून करण्याचा निर्णय

Pune Crime | पुण्याच्या मार्केटयार्डमध्ये डाळींब पॅकिंगवरुन तरुणावर तलवारीने वार; जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या 5 जणांना अटक

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Prakash Ambedkar | Prakash Ambedkar’s direct threat to Ashok Chavan ?; He said – ‘Do you want to go to jail with your wife and mother-in-law?’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update