Prakash Ambedkar | शिवसेनेसोबतच्या युतीबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले -‘आमच्या युतीबाबत…’

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यामुळे समोरासमोर उभ्या टाकलेल्या दोन गटांचा वाद निवडणूक आयोगासमोर (Election Commission) पोहोचला असताना ठाकरे गटाला महाराष्ट्राच्या राजकारणात नवा साथीदार मिळण्याची तयारी सुरु झाली आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीशी (Vanchit Bahujan Aghadi) ठाकरे गट युती होणार असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. प्रकाश आंबेडकर यांनीही बोलणी सुरु असून काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादी (NCP) सोबत असल्यास हकरत नसल्याचे सांगितले आहे. माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

 

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी युतीची (Alliance) घोषणा करावी अशी आमची भूमिका आहे. परंतु आमच्या युतीबाबत ठाकरे गट आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सध्या चर्चा करीत आहे. सर्वांनी एकत्र मिळून युतीची घोषणा करावी असं उद्धव ठाकरे यांना वाटत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीने आम्हाला नाकारलेलं होतं. मात्र, आम्ही त्यांना नाकारलेलं नाही, आम्ही केवळ दलितांपुरत मर्यादित राहावं अशी काँग्रेस, राष्ट्रवादीची भूमिका आहे, ती आम्हाला मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

काँग्रेसला आमचा विरोध नाही

प्रकाश आंबेडकर यांनी युती संदर्भात वंचित बहुजन आघाडीची भूमिका रोखठोकपणे मांडली.
त्यांनी एकीकडे उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्याची तयारी दर्शवली आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीला
युतीची गरज असेल तर त्यांनी आमच्याशी चर्चा करावी असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहेत.
तसेच ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आल्यास आम्ही विरोध करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.

 

 

Web Title :- Prakash Ambedkar | prakash ambedkars reaction on thackeray group vanchit bahujan aghadi alliance

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा