Prakash Mahajan | ‘हे हिंदुत्वाचे वारसदार आहेत की इम्रान हाश्मीचे…’, प्रकाश महाजनांचा टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) हेच खरे हिंदुत्वाचे वारसदार असल्याचे प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) सभेत कडवट हिंदुत्वाचे विचार (Thoughts of Hindutva) मांडले जात होते. परंतु आज त्यांच्या विचारांचा वारसा सांगणारा जो पक्ष आहे त्या पक्षाच्या सभेला इमाम सांगतात गर्दी करा. आणि जे दुसरे आहेत त्यांच्या सभेत सगळं गुफ्तगू चाललं आहे. हे हिंदुत्वाचे वारसदार आहेत की इम्रान हश्मींचे (Imran Hashmi) हेच कळत नाही, असा टोला प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी लगावला.

प्रकाश महाजन (Prakash Mahajan) पुढे म्हणाले, सध्या हिंदुत्वाचा वारसा सांगणारे अनेक जण आहेत. परंतु ज्या बाळासाहेबांच्या सभेत हिंदुत्वाचे धगधगते विचार ऐकवले जायचे त्याच बाळासाहेबांच्या वारशाच्या नेतृत्वाखाली जो पक्ष आहे तिथे कुराणाच्या आयता पठण केल्या जातात. मौलवी फतवे काढतात की त्यांच्या सभेला गर्दी करा. दुसरीकडे जो एक वर्ग म्हणतो आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय त्यांच्या मिरवणुकीत इलू इलू चालले आहे. हे हिंदुत्वाचे वारसदार आहेत, बाळासाहेबांचे वारसदार आहेत की इम्रान हश्मीचे वारसदार हे समजायला मार्ग नसल्याचे महाजन म्हणाले.

भाजपचे हिंदुत्व सोयीनुसार

राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचं म्हणजेच मनसेचं हिंदुत्व हे शरीरावर चिकटलेल्या त्वचेसारखं आहे ते आमच्यापासून वेगळं करता येणार नाही. भाजपचं (BJP) हिंदुत्व सोयीनुसार आहे. कपड्यासारखं ते कधीही अंगावरुन काढून खुंटीला टांगू शकतात, अशी टीका प्रकाश महाजन यांनी भाजपवर केली.

राज ठाकरे खरे हिंदुत्वाचे वारदार

महाजन पुढे म्हणाले, हिंदुत्वाचे खरे वारसदार कोण असतील तर ते राज ठाकरे आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या कडवट हिंदुत्वाचा वारसा राज ठाकरेच घेऊन जात आहेत. कारण हे आम्ही नाही आता लोकच म्हणत आहेत.
राज ठाकरे यांनी कधीच बाळासाहेबांच्या संपत्तीवर अधिकार सांगितला नाही. त्यांनी आपलं काम केलं
आणि लोकांनी
ठरवलं की बाळासाहेबांच्या नंतर हिंदुत्वाचा विचार कोण पुढे नेईल तर ते आहेत राज ठाकरे.

शिंदे-फडणवीस यांना आमची गरज पडू शकते

एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज ठाकरे
यांची निवडणुकीत युती होईल की नाही याबाबत राज ठाकरे सांगू शकतात. निवडणुकीच्या आधी युती
करायची की नंतर याचा निर्णय राज ठाकरेच घेतील. तसेच उद्या शिंदे गटला किंवा भाजपला आमची
गरज पडू शकते. त्यामुळेच राज ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी चांगले संबंध ठेवले आहेत, असंही प्रकाश महाजन यांनी सांगितलं.

Web Title : Prakash Mahajan | raj-thackeray-hindutva-is-the-real-hindutva-
others-are-like-imran-hashmi-says-mns-leadar-prakash-mahajan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Abdul Sattar | दोन दिवसांत पंचनामे करुन विधिमंडळात भरपाईची घोषणा करणार, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती

Devendra Fadnavis | समाजाच्या उत्तम भविष्यासाठी नव्या पिढीला संस्कृतीची माहिती आवश्यक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस