प्रेग्नंट असणाऱ्या ‘बेबो’ करिनाचा दिवाळीत खास प्लॅन ! मुंबईत नव्हे तर ‘इथं’ करणार सेलिब्रेशन

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी यंदा दिवाळी पार्टीचं आयोजन रद्द केलं आहे. याचं कारण आहे ते म्हणजे कोरोना महामारी. बॉलिवूड स्टार करिना कपूर (Kareena Kapoor) ही नुकतीच शूटिंग संपवून मुंबईत आली आहे. तिचा पती अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) त्याच्या आगामी भूत पोलीस (Bhoot Police) सिनेमाच्या शूटिंगसाठी धर्मशाला येथे गेला आहे. यंदाच्या दिवाळी सेलिब्रेशनबद्दल सांगताना करिनानं सांगितलं की, यंदा ती मुंबईच्या झगमगाटापासून दूर दिवाळी साजरी करणार आहे.

करिनानं सांगितल की, हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला येथे यंदाची दिवाळी साजरी करणार आहे. तैमूरही (Taimur Ali Khan) तिथंच दिवाळीचा आनंद घेताना दिसणार आहे. करिना म्हणाली की, पर्वतात प्रवास करणं आणि मोकळ्या आकाशाखाली सूर्याचं ऊन पाहत काही वेळ व्यतित करणं खूप सुंदर असेल.

करिनानं हेही सांगितलं की, ती यावर्षी जास्त वेळ घरीच राहिली आहे. अशात आता घरापासून दूर धर्मशालामध्ये राहणं एक चांगला अनुभव असेल. करिना सध्या प्रेग्नंट आहे. लवकरच चौथा सदस्य त्यांच्या घरी चाहूल देणार आहे.

करिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा अंग्रेजी मीडियम हा सिनेमा 13 मार्च 2020 रोजी रिलीज झाला होता. लवकरच ती करण जोहरच्या तख्त या मल्टिस्टारर सिनेमातही काम करताना दिसणार आहे. हा सिनेमा 2021 मध्ये रिलीज होणार आहे. करीनाकडे लाल सिंह चड्ढा हा सिनेमाही आहे. या सिनेमात ती आमीर खानसोबत काम करणार आहे. पुढील वर्षी ख्रिसमसला हा सिनेमा रिलीज होणार आहे.