महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी प्रेरणा वरपूडकर यांची निवड जाहीर

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. यात युवक काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीत अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश झाला. पक्ष बळकटीसाठी निवड झालेल्या नवीन चेहऱ्या कडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (11 जुलै) रोजी निवड झाल्याचे समोर आले आहे.

परभणी जिल्ह्यातून युवा नेत्या प्रेरणा वरपुडकर यांची निवड जाहीर झाली आहे. या निवडी प्रसंगी त्यांनी युवक काँग्रेसच्या कार्यकरणी मध्ये काम करण्याची संधी दिल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांचे आभार मानले आहे. युवा नेत्या प्रेरणा वरपूडकर यांची प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाल्याने युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

प्रेरणा वरपूडकर यांचा नेहमीच सामाजिक कार्यात सहभाग असतो. महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव म्हणून त्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून चांगले काम केले आहे. माजी राज्यमंत्री तथा आ. सुरेश वरपूडकर यांच्या त्या सूनबाई आहेत. पक्षाकडून त्यांच्या केलेल्या कामाची दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. पक्षाने दाखवलेला विश्वास संपादन करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया प्रेरणा वरपुडकर यांनी दिली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like