राष्ट्रपती राजवटीचा फटका ! मुख्यमंत्री सहाय्यता कार्यालयाला ‘टाळे’, गरजू रुग्ण वैद्यकीय सहाय्यता निधीपासून ‘वंचित’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात राष्ट्रपती राजवटीचा फाटका बसण्यास सुरुवात झाली आहे. याचा पहिला मोठा फटका बसलाय तो वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक निधीची गरज असलेल्या गरजू रुग्णांना. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता कक्षेला टाळं लावण्यात आलं आहे. त्यामुळे गरजू रुग्णाला आवश्यक निधी न मिळाल्याने परवड झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही सेवा बंद करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर गरजू रुग्णांना मदत देण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता कक्षेवर सूचना पत्र लावण्यात आले आहे की कार्यालय बंद आहे, चौकशी करु नये. हा सहाय्यता निधी बंद झाल्याने 5 हजार 600 पेक्षा जास्त गरजू रुग्णांना वैद्यकीय कारणांसाठी आवश्यक निधीचा फटका बसला आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून मागील 5 वर्षात 21 लाख रुग्णांना मदत देण्यात आली आहे. 600 कोटी पेक्षा जास्तीचा निधी 60 हजार पेक्षा जास्त गरजू रुग्णाला पुरवण्यात आला आहे. परंतू आता हा निधी देण्यात अडचण निर्माण झाली आहे. कारण ज्या कार्यालयातून निधीसाठीची प्रक्रिया राबवली जाते ते मुख्यमंत्री सहाय्यता कार्यालय बंद करण्यात आले आहे. यामुळे जीवन मरणाच्या रेषेवर असणारे अनेक गरजू रुग्ण सहायत्ता निधीपासून वंचित आहेत.

या सहाय्यता निधीची लाभ घेणारे रुग्णांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. हे रुग्ण गरजू असून त्यांचे उत्पन्न देखील कमी आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत निधी पुरवण्यात येतो. मात्र आता या सहाय्यता कार्यालयालाच टाळे लावण्यात आल्याने आता या रुग्णांना वाली राहिला नाही.

Visit : Policenama.com