‘राष्ट्रपती राजवट म्हणजे महाराष्ट्राचा घोर अपमान’ : राज ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रपती राजवट म्हणजे महाराष्ट्राचा घोर अपमान असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. एका वृत्तवाहिनीला त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर त्यांनी यावर टिपण्णी केली आहे.

राज ठाकरे म्हणाले, “हा नतद्रष्टाचा खेळ आहे. राष्ट्रपती राजवट म्हणजे महाराष्ट्राचा घोर अपमान आहे. राज्यात अनेक समस्या सुरू आहेत. राज्यातील शेतकरी पिचलेला आहे. अशा परिस्थितीत सत्तेसाठी नतद्रष्टांचा खेळ सुरू आहे.” असे म्हणत खास ठाकरे शैलीत राज ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात प्रमुख राजकीय पक्षांपैकी कोणताही पक्ष अद्याप सत्ता स्थापनेचा दावा करू शकलेला नाही. यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी शिफारस केली होती. त्यांच्या या शिफारसीला मंजुरी देण्यात आली. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीनही पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करण्यात अपयशी ठरल्याने महाराष्ट्रात ही परिस्थिती ओढवली आहे. राज्यपालांच्या शिफारसीनंतर आता राज्यात राष्ट्रपती लागवट लागू करण्यात आली आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like