तळेगावात जुगार अड्ड्यावर छापा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

तळेगाव दाभाडे येथील सेवाधाम रुग्णालयाच्या जवळ झाडाखाली मटका घेणाऱ्या एका विरुद्ध तळेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी १६६० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहेत. ही कारवाई बुधवारी दुपारी अडीजच्या सुमारास करण्यात आली.
सचिन आबू चव्हाण (तळेगाव दाभाडे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर पोलीस विनोद विठ्ठल नागलोथ यांनी फिर्याद दिली आहे.

तळेगाव दाभाडे येथे मटका सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.
पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर अवैद्य धंद्यावर कारवाई सुरु आहे. यापूर्वी पिंपरी, भोसरी, वाकड, सांगवी, हिंजवडी, तलेगाव एमआयडीसी या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र कारवाई झाल्यानंतर काही दिवसातच पुन्हा हे धंदे सुरू होत आहेत. तर दिघी, देहूरोड, चाकण या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैद्य धंदे सुरु असताना त्यावर अद्याप कारवाईचा बडगा उचलला नाही. याच बरोबर काही ठिकाणी हुक्का सेंटर खुलेआम सुरू असतानाही त्याकडे स्थानिक पोलीस कानाडोळा करत आहेत.

समलैंगिकता गुन्हा नाही : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

[amazon_link asins=’B074ZF7PVZ,B01MCUSD3L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b3e9d14d-b1a7-11e8-8823-1514565dbc62′]