….तेव्हा RSS वाले ब्रिटीशांची चमचागिरी करत होते : प्रियंका गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बठिंडा येथे मोदींनी केलेल्या टीकेला प्रियंका गांधी यांनी चोख प्रत्त्यूत्तर दिले आहे. जेव्हा पंजाब देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होता. तेव्हा आरएसएसवाले ब्रिटीशांची चमचागिरी करत होते. त्यांनी कधीही देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही. असं वक्तव्य त्यांनी आज बठिंडा येथे केले.

१९ मे रोजी सातव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तत्पुर्वी देशात विरोधक आणि सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यात नरेंद्र मोदी आणि प्रियंका गांधी यांच्यात जोरदार युध्द रंगले आहे. प्रियंका गांधी यांनी बठिंडा येथे मोदींना पुन्हा एकदा गेल्या पाच वर्षांतील कामावरून लक्ष्य केलं.

तर मोदी सरकारने फक्त कागदांवरच मोठमोठी आस्वासनं दिली आहेत. परंतु वास्तवात त्यांनी काहीच केले नाही. देशात बेरोजगारीची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. संरक्षण क्षेत्रातही दलाली सुरु आहे. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे तर लक्ष दिलं गेलेल नाही. त्यामुळेच जनतेनं त्यांना सत्तेतून पायउतार केलं आहे. असंही त्या म्हणाल्या.