‘बॅकलेस साटन’ गाउनमध्ये प्रियंकाचा ‘स्टनिंग’ लुक !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रियंका चोप्रा ही इंडस्ट्रीची प्रसिद्ध आणि स्टाईलिश अभिनेत्री आहे. ती आपल्या हॉटनेस आणि बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. तिचा एअरपोर्टपासून ते रेड कार्पेटपर्यंतचा प्रत्येक लुक व्हायरल होत असतो.

सध्या प्रियंकाच्या फॅशन सेन्सचे खूप कौतुक आहे. देसी गर्लच्या ड्रेसिंग सेन्सला कोणतीच तोड नाही. तिचा प्रत्येक लूक आणि स्टाईल चाहत्यांना प्रभावित करत असते. ग्लोबल स्टाईल आयकॉन म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रियंकाच्या स्टाइलला मुली फॉलो करत असतात.

नुकतीच प्रियंका ग्रॅमी अवॉर्ड्स शोमध्ये पोहोचली होती. तिचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये प्रियंका बॅकलेस साटन गाउनमध्ये जबरदस्त दिसत आहे. तिने सटबल मेकअप, डार्क आई मेकअप, ओपन शॉर्ट हेअरसह आपला लुक पूर्ण केला आहे.

या फोटोंमध्ये प्रियंका रेड कार्पेटवर आपला किलर फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे. देसी गर्ल आपल्या अंदाजमध्ये मीडियासमोर स्टाईलमध्ये पोझ देताना दिसत आहे. प्रियंकाचे हे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत. चाहत्यांना तिचे फोटो खूप पसंतीस पडले आहे.

तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर, प्रियंका सध्या राजकुमार रावसोबत ‘द व्हाइट टायगर’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. भंसालीच्या आगामी चित्रपटात रणवीर सिंगसोबत ‘बैजू बावरा’ या चित्रपटात ती दिसणार असल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय तिच्याकडे हॉलिवूडचे अनेक प्रोजेक्टही आहेत.