THROWBACK PICS : चर्चेत ‘देसी गर्ल’चा OSCAR अवार्ड ‘लूक’, स्ट्रेपलेस गाउनमध्ये दिली स्टाइलिश ‘पोज’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा आपल्या अभिनयाशिवाय आपली स्टाइल आणि फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. काही काळापूर्वी प्रियंका स्टायलिश लूकमध्ये पतीसोबत ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये आली होती. प्रियांकाच्या या लूकमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. प्रियंकाचा प्रत्येक लूक चर्चेचा विषय बनतो.

https://www.instagram.com/p/B8XKHC_pSJc/

2020 मध्ये देसी गर्ल ऑस्कर कोणत्या स्टाइलमध्ये येईल याची चाहते वाट पहात असतात. यावेळी प्रियंका अ‍ॅकॅडमी अवॉर्ड्समध्ये भाग घेऊ न शकल्याची बातमी चाहत्यांना सोशल मीडियामार्फत कळाली तेव्हा ते निराश झाले.

अभिनेत्री प्रियंकाने आपल्या ट्विटरवर ट्वीट करून लिहिले आहे की, ‘यावेळी मी अकादमी पुरस्कारांमध्ये भाग घेऊ शकले नाही परंतु मी तुम्हा सर्वांबरोबर ऑस्कर पुरस्कार पाहणार आहे. चला तर मग तुम्ही मला सांगा की तुम्ही कोणाला सपोर्ट करणार आहात.’ #PCOscarParty. इतकेच नाही तर प्रियंकाने इन्स्टाग्रामवर आपले थ्रोबॅक फोटोही शेअर केले आहेत. तिने आपली 4 फोटो शेअर केले आहे.

प्रियंकाचे हे फोटो 2016 आणि 2017 च्या ऑस्कर दरम्यानचे आहे. तिच्या लूकबद्दल बोलायचे म्हणले तर 2016 मध्ये जुहैर मुराद यांनी डिझाइन केलेले व्हाइट कलरच्या गाउनमध्ये प्रियंका दिसली होती. 2017 मध्ये प्रियंका चोप्राने राल्फ अ‍ॅण्ड रुसोचा स्ट्रेपलेस सिल्वर-व्हाइट गाउन परिधान केला होता. प्रियंकाच्या या फोटोंना खूप वर्ष झाली आहे. तरी देखील आज तिच्या फोटोंची चर्चा सुरु आहे.

तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणवले तर सध्या राजकुमार रावसोबत ‘द व्हाइट टायगर’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर ती संजय लीला भन्साळीच्या आगामी चित्रपटात रणवीर सिंगसोबत ‘बैजू बावरा’ या चित्रपटात दिसणार असल्याची माहिती समजली आहे.

https://www.instagram.com/p/B8X6I4bg2uu/