बीड जिल्ह्यातून ३ गुंड तडीपार

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – वेळोवेळी अटक करूनही कायद्याला न जुमानणाऱ्या बीड जिल्ह्यातील ३ सराईत गुंडांना १ वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांनी दिले आहेत.

धनराज उमाजी गिते, गोविंद उमाजी गिते, गणेश उमाजी गिते (रा, चांदापूर, ता. परळी जि. बीड ) अशी तडीपार करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

बीड जिल्ह्यातील गुंडगिरी करणाऱ्या टोळ्यांवर कायदेशीर कारवाई करूनही त्या कायद्याला जुमानत नसल्याचे व सामान्य जननेत दहशत पसरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस अधिक्षकांनी गुंडांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी पाठपुवारा करून पोलीस निरीक्षक डी. के. शेळके यांनी गंभीर गुन्हे करणारे तिघांविरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे २ वर्षे जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव पाठवला. उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आम्ले यांनी तिघांना २ वर्षे हद्दपार करण्याची शिफारस केली.

या टोळीतील तिघे शरीराविरूद्धचे गुन्हे करण्याच्या सवईचे गुंड व आडदांड वृत्तीचे आहेत. त्यामुळे लोकांमध्ये त्यांची दहशत आहे. त्यामुळे त्यांना बीड जिल्ह्यातून १ वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांनी दिले आहेत.