Protein Week 2021 | शरीरात दिसत असतील ‘ही’ 8 लक्षणे तर करू नका दुर्लक्ष, प्रोटीनच्या कमतरतेचा आहे इशारा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Protein Week 2021 | प्रोटीन आपल्या शरीराच्या मांसपेशींसाठी अतिशय आवश्यक पोषकतत्व आहे. प्रोटीन मांसपेशींसह आपली त्वचा, एन्जाइम्स आणि हामोन्सचे सुद्धा बिल्डिंग ब्लॉक होते. शरीराच्या सर्व ऊतींसाठी सुद्धा हे आवश्यक आहे. शरीरात प्रोटीनच्या कमतरतेमुळे अनेक प्रकारच्या शारीरीक अडचणी वाढतात. आज आपण अशी लक्षणे जाणून घेणार आहोत जी शरीरातील प्रोटीनची कमतरता दर्शवतात. (Protein Week 2021)

1. एडिमा –
शरीराच्या एखादा अवयवाला सूज येऊ लागते तेव्हा त्यास एडिमा म्हणतात. हे सुद्धा प्रोटीनच्या कमतरतेचे लक्षण आहे.

2. फॅटी लिव्हर –
प्रोटीनच्या कमतरतेमुळे लिव्हर किंवा लिव्हरच्या पेशींमध्ये फॅट जमा होण्याची समस्या वाढते.

3. त्वचा, केस आणि नखे –
प्रोटीनच्या कमतरतेमुळे त्वचा फाटते, डाग आणि लाल निशाण पडतात. केस पातळ होतात, गळतात. नखे कमजोर होतात.

 

4. मांसपेशींचे नुकसान –

मांसपेशींना प्रोटीन कमी मिळाल्यास शरीर बॉडी फंक्शन आणि आवश्यक ऊतींसाठी हाडांकडून प्रोटीन घेतात. यामुळे मांसपेशींचे नुकसाने होते. वृद्धांमध्ये ही समस्या गंभीर होते.

5. हाडांचे फ्रॅक्चर –
प्रोटीनच्या कमतरतेमुळे मांसपेशींच्या ऊतींसह हाडांच्या ऊतींवरही वाईट परिणाम होतो. हाडे कमजोर होऊ लागतात, तुटू शकतात, जोखीम वाढते.

6. मुलांचा शारीरीक विकास –
प्रोटीनच्या कमतरतेमुळे मुलांचा शारीरीक विकास बाधित होतो. कुपोषण होऊ शकते.

7. इन्फेक्शनचा धोका –
प्रोटीनच्या कमतरतेचा इम्यून सिस्टमवर सुद्धा वाईट परिणाम होतो. यामुळे इन्फेक्शनची जोखीम वाढते. ज्येष्ठांमध्ये लागोपाठ 9 आठवडे ही कमतरता राहिल्यास इम्यूनवर वाईट परिणाम होतो.

8. लठ्ठपणाची समस्या –
सतत भूक लागणे हे सुद्धा प्रोटीनच्या कमतरतेचे लक्षणे आहे. अशावेळी प्रोटीनऐवजी हाय कॅलरी फूडचे सेवन केल्यास लठ्ठपणाची समस्या ट्रिगर होऊ शकते.

* कसे मिळेल प्रोटीन
शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर करण्यासाठी अंडी, दही, दूध, पनीर, चिकन, मसूरची डाळ, शेंगभाज्या, ब्रोकली, बदाम आणि ओट्ससारखे पदार्थ सेवन करा. यातून भरपूर प्रोटीन मिळते.

Web Title :- protein week 2021 8 signs and symptoms of protein deficiency tlif

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ganpatrao Deshmukh | जेष्ठ नेते माजी आ. गणपतराव देशमुख यांचे 94 व्या वर्षी निधन; 54 वर्ष आमदार म्हणून केलं होतं मतदारसंघाचे प्रतिनिधित्व

Mantralaya Officers Transfer | ठाकरे सरकारचा सरकारी बाबूंना दणका ! तब्बल 103 अधिकाऱ्यांच्या बदल्या

Shambhuraj Desai | राणेंचं तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकात