170 आमदारांचा पाठींबा सिद्ध करून राज्याला स्थिर सरकार देऊ, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यानं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – संजय राऊत यांनी आज पुन्हा सकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला होता. यावेळी संजय राऊत यांनी भाजपसोबत अजित पवार यांच्यावर देखील चांगलीच टीका केली होती. त्यानंतर आता भाजपच्या आशिष शेलार यांनी राऊत यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला आहे. ३० नोव्हेंबर रोजी आम्ही किमान १७० आमदारांसह संख्याबळ दाखवून राज्याला स्थिर सरकार देऊ असे देखील शेलार यावेळी म्हणाले.

राऊत यांनी आम्हाला चांगले वाईट शिकऊ नये कारण काळ्या काचेच्या गाडीतून आम्ही अहमद पटेलांना भेटायला गेलो नव्हतो असा टोला शेलार यांनी लगावला आहे. संजय राऊत यांना दिल्लीत सोनिया गांधींशी केलेली जवळीक चालते मग आता अजित पवार आमच्यासोबत का चालत नाही असा सवाल देखील आशिष शेलार यांनी केला आहे.

आम्ही संघाचे कार्यकर्ते आहोत त्यामुळे शपत विधीसाठी आम्हाला सकाळची राम प्रहर आवडते म्हणून सकाळी शपथविधी पार पडला असल्याचे शेलारांनी यावेळी स्पष्ट केले. ३० नोव्हेंबर रोजी आम्ही नक्कीच बहुमत सिद्ध करू आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्याला स्थिर सरकार देऊ. तसेच जनतेचे आम्ही आभार मानतो आणि भविष्यात जनतेची सेवा करण्याचे काम फडणवीस सरकार करेल असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला आहे.

Visit : Policenama.com