छत्तीसगडमध्ये ‘चकमक’ ! पोलीस उप निरीक्षक ‘शहीद’ तर 4 नक्षलवाद्यांचा ‘खात्मा’

राजनांदगाव : वृत्त संस्था – छत्तीसगड मध्ये नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत एक पोलीस उपनिरीक्षक शहीद झाले आहेत. या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले आहेत. पोलिसांनी मोठा शस्त्र साठा जप्त केला आहे. छत्तीसगडमधील राजनांद जिल्ह्यामधील मानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परधोनी गावाजवळ पोलिसांची नक्षलवाद्यांबरोबर ही चकमक झाली. त्यात चार नक्षलवादी ठार झाले.

मात्र, एका पोलीस उपनिरीक्षकाला आपले प्राण गमवावे लागले. या वेळी पोलिसांनी नक्षलवाद्यांकडून १ एके रायफल, १ एसएलआर शस्त्र आणि दोन रायफली जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती राजनांदगावचे पोलीस अपअधीक्षक जी़ एन बघेल यांनी दिली.

याच ठिकाणी १२ जुलै २००९ मध्ये नक्षलवाद्यांबरोबर चकमक झाली होती. त्यात पोलीस अधीक्षक व्ही के चौबे यांच्यासहीत ९ पोलीस कर्मचारी शहीद झाले होते.