Pub Owners In Pune | आता कारवाई ! तेव्हा मात्र हप्ते घेत होते; पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, महापालिका निर्दोष कसे? पब मालकांचा सवाल

पुणे : Pub Owners In Pune | कल्याणीनगर येथे झालेल्या अपघाताप्रकरणी (Porsche Car Accident Pune) पोलिसांच्या कारवाईला (Pune Police Action) मोठा वेग आलेला आहे. आतापर्यंत एकूण 7 जणांना या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. तसेच विविध 100 सीसीटीव्ही यांची तपासणी सुरु असल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे.

या प्रकरणानंतर पोलीस विभाग (Pune Police), राज्य उत्पादन शुल्क विभाग (Pune Excise Department), पुणे महापालिका (Pune Municipal Corporation-PMC) यांनी कारवाईचा धडाका सुरु केला आहे. जे पब, बार अनधिकृत आहेत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यामुळे आमच्यावरच कारवाई का कालपर्यंत हेच विभाग आमच्याकडून हप्ते खात होते, मग अचानक कारवाई का? असा प्रश्न ही पब व्यावसायिक उपस्थित करीत आहेत.

याबाबत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “मुळात ‘पब’ असा काही वेगळा परवाना नसतो. परमिट रूम आणि पब यांचा परवाना सारखाच असतो. जिथे म्युझिक आहे, डान्सफ्लोर आहे, त्याला ‘पब’ म्हटले जाते. पण, त्यासाठी काही तसे नियम नाहीत. आजचे नियम एवढे विचित्र आणि क्लिष्ट आहेत की पुण्यातील सर्व परमिट रूम बंद करावे लागतील. मग, आता जे सुरू आहेत, त्यांच्याकडून नियमांचे किती उल्लंघन होते, हे पाहिले जात नाही का? उद्या सगळ्याच बारना कुलूप ठोकावे लागेल. काही निवडक पबना टाळे ठोकणे बरोबर नाही, असे या मालकांचे म्हणणे आहे. पबमालक नियमांचे उल्लंघन करीत असतील, तर त्याचा अर्थ पोलिस, एक्साइज, महापालिका हेही नियम पायदळी तुडवत असतात. नियम बदलून बंगल्यात पब सुरू होतात, तेव्हा महापालिका काय करते, असा सवाल आहे. आज जे नियम आम्ही मोडले असे वाटते, ते इतके दिवस यांना दिसत नव्हते का? असे विचारत यंत्रणा काय करते? असेही प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. (Pub Owners In Pune)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut On Ajit Pawar | अजित पवाराचे उमेदवार पाडण्यासाठी शिंदे आणि यंत्रणेचे खास प्रयत्न,
निवडणुकीत ‘समृद्धी’ने डोळे दिपले : संजय राऊत

Sharad Pawar | शरद पवारांना मोठा धक्का; दोन नेते साथ सोडणार?

Ajit Pawar | अजित पवारांच्या रडारवर कोण? कोणाची जाणार खुर्ची, पदाधिकारी टेन्शनमध्ये…

Health News | दुचाकी चालवताना शेकडो तरुण-तरुणी, महिला वापरतात इयरफोन, वेळीच व्हा सावध व्हा! ‘हे’ 5 प्रकारचे गंभीर नुकसान टाळा