PUBG चा नशा चढल्यानं ‘हात-पाय’ बांधून नेलं हॉस्पीटलमध्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या तरुणांना पबजी गेमचे इतके वेड लागले आहे. की मुले तासनतास गेम खेळत असतात. या गेममुळे अनेक मुलांच्या डोक्यावर परिणाम झाल्याची घटना समोर आली आहे. या गेममुळे अनेक मुलांचे नुकसान झाले आहे. मुले रात्रंदिवस पबजी गेम खेळत असतात. त्यामुळे त्यांना गेमशिवाय काहीच सुचत नाही. असेच एक प्रकरण समोर आले आहे.

एका मुलाला PUBG गेमचे इतके वेड लागले की, घरातील लोकांनी त्याला दोरीने बांधून रुग्णालयात आणले. वडील म्हणाले की, मुलगा पबजी खेळल्यामुळे मानसिकदृष्ट्या आजारी पडला आहे.

बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील हे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. बिहारच्या बक्सरच्या या घटनेने लोकांच्या मनात असा विचार आला आहे की, इंटरनेटमधील पबजी गेमने तरुणांना कसे घेरले आहे.

बक्सरच्या मठिया मोरमध्ये राहणाऱ्या मोनू नावाच्या मुलाला पबजी गेमचे इतके वेड लागले होते. त्यामुळे घरातील लोकांशी तो खूप वाईट पद्धतीने बोलत असे. कधी कधी तो रागाने त्यांच्या अंगावर धावून जात असे.

त्याच्या या वागणूकीला कुटुंबातील लोक खूप वैतागले होते. त्यांनी मुलाचे हातपाय बांधून त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेले. जिथे त्याच्यावर उपचार केले गेले. कुटुंबियांनी सांगितले की, त्याची अशी परिस्थिती पबजी गेम खेळण्यामुळे झाली.