‘वंचित बहुजन’चा जाहीरनामा प्रकाशित’

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीत वेगवेळ्या पक्ष्याच्या जाहीरनामे प्रकाशीत होत असतानाच वंचित बहुजन चा जाहीरनामा लक्ष्मण माने यांच्या हस्ते प्रकाशीत झाला. त्यावेळी पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनिल जाधव, बारामती मतदारसंघातील उमेदवार नवनाथ पडळकर, भारिपचे शहर अध्यक्ष अतुल बहुले आणि प्रवक्त्या रमा गोरख, सचिन माळी आदी उपस्थित होते.

जाहीरनाम्यात पाच एकरपेक्षा कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांना दोन हप्त्यात प्रति एकर वार्षिक १२ हजार अनुदान, शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज, शेतमालाच्या गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक दराच्या ९० टक्के हमीभाव, देशभर मोफत शीतगृहे, शिक्षणावर ‘जीडीपी’च्या १२ टक्के खर्च, ‘केजी टू पीजी’ शिक्षण मोफत, मतपत्रिकेद्वारे मतदान, लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा, जुनी पेन्शन व्यवस्था पुन्हा सुरू करणार आदी आश्वासने वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत. आम्ही सत्तेवर आल्यास सहकारी संस्थांचे पुनरुज्जीवन करू.

कर्ज वितरणात सुलभता, १५ रुपयांच्या कार्डावर शासकीय रूग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सेवासुविधा मोफत दिल्या जातील,’ असेही माने यांनी सांगितले. घटनामतक दर्जाच्या संस्थाना स्वायत्तता दिली जाईल. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येची केंद्रीय पातळीवर चौकशी केली जाईल.

तसेच गुजरातसह सर्व दंगलींची फेरचौकशी केली जाईल. महिला केंद्री, स्त्रीवादी भूमिकांचा स्वीकार, सर्व क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्यावर भर दिला जाईल, विविध संघटनानी राज्यघटनेच्या चौकटीत काम करतील यासाठी घटनामतक तरतूद केली जाईल. असा सर्व समावेश जाहीरनामा वंचित बहुजन ने प्रकाशित केला.