पुलवामा : सुसाइड बॉम्बरला ‘मदत’ करणारा अटकेत

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील वर्षी जम्मू – काश्मीरमध्ये पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) मोठे यश मिळाले आहे. सुसाईड बॉम्बर आदिल अहमद डार उर्फ आदिल अहमद गादी टेकरनवाला उर्फ वकास कमांडो याला मदत करणारा शाकिर बशीर याला शुक्रवारी (दि. 28) अटक करण्यात आली आहे.

दहशतवादी संघटना जैश – ए – महंमदचा म्होरक्या असलेल्या शाकिर बशीरने आदिल अहमद डार याला राहण्यास घर उपलब्ध करून दिले होते. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील लेथापोरा या अवंतीपोराजवळ असलेल्या ठिकाणी सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या सुरक्षा दलांच्या वाहनांच्या ताफ्यावर एक आत्महघातकी हल्लेखोराने आपल्या वाहनासह हल्ला केला होता.

ADV

हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनामध्ये स्फोटके भरण्यात आली होती. ताफ्यातील केंद्रीय राखीव बलातील सुमारे 40 जवानांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर हल्लेखोरदेखील मरण पावला होता. या ताब्यात सुमारे 78 वाहने व 2500 पेक्षा जास्त जवान होते. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील इस्लामिक गट जैश – ए – महंमदने स्वीकराली होती.

या हल्ल्यामध्ये ठार झालेल्या आत्मघातकी हल्लेखोराचे नाव आदिल अहमद डार असे होते. या अपघातानंतर त्या हल्लेखोराचा एक व्हिडिओ जारी करण्यात आला होता. हा हल्ला घडवून आणण्यासाठी मारुती इको वाहनाचा वापर करण्यात आला होता. या वाहनात तब्बल 300 किलो स्फोटके असावीत असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.