Pune : कचरा डेपोत पोकलेन उलटून झालेल्या अपघातात कचरावेचक तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वानवडी येथील कचरा डेपोत पोकलेन उलटून झालेल्या अपघातात कचरावेचक तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांच्या अंगावर हा पोकलेन पडला. सोमवारी ही घटना घडली आहे.

शाहबाज शेख ( वय २४, रा. हडपसर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोकलेन चालक रूपेश कुमार (वय २१, रा. रामटेकडी, हडपसर) याच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी शाहबाज रामटेकडी इंडस्ट्रीज एरिया महानगरपालिका कचरा डेपोत कचरा वेचत होता. त्यावेळी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास रूपेश कचरा ढिगाऱ्यावर पोकलेन चालवित होता. रूपेशने उंच असलेल्या ढिगाऱ्यावर पोकलेन चढविल्यामुळे पोकलेन खाली पडला. त्यामुळे पोकलेनची बकेट लागून शाहबाज गंभीररीत्या जखमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अधिक तपास वानवडी पोलीस करीत आहेत.

You might also like