Pune : दात घासण्याच्या चूकीच्या सवयीमुळे सुमारे 70 % रुग्णांना हिरड्यांच्या रक्तस्त्रावाची समस्या : पीरियडॉन्टिस्ट एण्ड इम्प्लांटोलॉजिस्ट (गम स्पेशलिस्ट) डॉ. प्राची हेंद्रे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   मौखिक आरोग्याची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे असून निरोगी आयुष्याकरिता दातांची निगा राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दात दुखण्याची समस्या घेऊन येणा-या जवळपास ७० टक्के रुग्णांना दात व्यवस्थित न घासल्यामुळे तसेच दातांची योग्य निगा न राखल्याने हिरड्यांमधुन रक्तस्त्राव होण्यासारख्या समस्या उद्भवत असून हिरडयांतून येणा-या रक्तस्त्रावाकडे दुर्लक्ष न करता वेळीच भेट दया.

हिरड्यांमधून रक्तस्त्राव होण्याच्या इतर कारणांमध्ये स्त्रियांमध्ये होणारे हार्मोनल बदल, खाण्याच्या चूकीच्या सवयी आणि रक्तातील साखरेची अनियंत्रित पातळी यांचा समावेश आहे . याकरिता दात घासण्याचे योग्य तंत्र जाणून घ्या, दर सहा महिन्यांनंतर दंतचिकित्सकास भेट द्या आणि हिरड्यांची समस्या कमी करण्यासाठी हिरव्या पालेभाज्या आणि ताजे फळे खा. हिरड्यांची तसेच दातांची काळजी हे मूल जन्मल्यानंतर ६ महिन्यांपासूनच सुरू व्हायला हवी आणि उर्वरित आयुष्यभर दातांची निगा ही राखलीच गेली पाहिजे.

हिरड्यांमधील रक्तस्त्राव, पेरीओन्डोटायटीस आणि दात किडणे यासारख्या दातांच्या समस्या सामान्यत: लोकांमध्ये दिसून येतात आणि ही संख्या चिंताजनक पध्दतीने वाढत आहे. बरेच लोक दात घासण्याचे चुकीचे तंत्र वापरतात जे चुकीचे ब्रश वापरुन, खुप जोरजोरात दात घासतात किंवा अगदी हळूवारपणे दात घासतात. तर काही जण दोन्ही बाजूंनी दात घासत नाहीत किंवा खूप वेळ दात घासणे अथवा अगदी कमी कालावधीतच दात घासणे अयोग्य आहे. दाताच्या आतील पृष्ठभाग पोकळी निर्माण होणे, किड लागणे आदी समस्या उद्भवतात. म्हणून योग्य तंत्राचा अवलंब करून दात घासणे आवश्यक आहे. दात घासण्याच्या अयोग्य तंत्रासह इतर काही घटक देखील आहेत ज्यामुळे हिरड्यांची समस्या उद्भवू शकते.

पुण्यातील अपोलो क्लिनिकच्या पीरियडॉन्टिस्ट एण्ड इम्प्लांटोलॉजिस्ट (गम स्पेशलिस्ट) डॉ. प्राची हेंद्रे सांगतात की, “दातांच्या समस्या घेऊन येणार्‍या रुग्णांपैकी जवळजवळ ७० टक्के रुग्णांना हिरड्यांतून रक्त येत असल्याची समस्या दिसून येते. आणि ही समस्या दात घासण्याच्या चूकीच्या सवयीमुळे होते. त्याचप्रमाणे, ३० ते ४० वयोगटातील महिलांना गरोदरपणामुळे तसेच हार्मोन्सची पातळी जास्त असल्यास हिरड्यांभोवती असलेल्या बॅक्टेरियांच्या अस्तित्वामुळे ते अधिक संवेदनशील असतात, त्यामुळे त्यांच्या हिरड्यातून सहज रक्तस्राव होऊ शकतो. मधुमेह असलेल्या लोकांना मौखिक आरोग्य समस्या विकसित करण्याचा धोका असतो. एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील साखर खराब नियंत्रित असल्यास, ती / तिला तोंडी आरोग्य समस्या विकसित होण्याची अधिक शक्यता असते. असं होतं कारण अनियंत्रित मधुमेहामुळे पांढर्या रक्त पेशी कमजोर होतात, ज्या शरीराच्या मुख्य संरक्षणास तोंड देतात ज्या जीवाणूंच्या संक्रमणांविरूद्ध आपला बचाव करत असतात. हिरड्यांना रक्तस्त्राव होण्यास कारणीभूत असणा खाण्याच्या चांगल्या सवयी असणे गरजेचे आहे. मुख्यतः ब्रेड आणि चीप्स यासारखे पदार्थ दातांना चिकटल्याने. त्यातील बॅक्टेरिया दातांवर हल्ला करतात आणि त्यामुळे दातांच्या समस्या उद्भवात.

निरोगी हिरडयांसाठी आपल्या आहारात खालील पालेभाज्या आणि फळांचा नक्की समावेश करा –

दात घासण्याच्या आणि दातांच्या स्वच्छतेबाबत योग्य तंत्राबद्दल दंतचिकित्सकांचा वेळीच सल्ला घ्या. आपल्या आहारात बेरीज, किवी, सफरचंद,नासपती, बेरी, संत्री, क्रॅनबेरी आणि गाजर, पालक, ब्रोकोली आणि पालेभाज्यांचा समावेश करा. आपल्या हिरड्याचे आरोग्य चांगले राहण्यासाठी दर ६ महिन्यांनंतर दंतचिकित्सकास भेट द्या.