Pune : 16 हजाराची लाचप्रकरणी खासगी व्यक्तीवर अ‍ॅन्टी करप्शनकडून FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील एका वजनदार पोलीस कर्मचाऱ्याचे लाचप्रकरण ताजे असताना येथील पोलिसांसाठी 16 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी धनंजय अधिकारी या खासगी व्यक्तीवर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील तक्रारदार यांचे किरकोळ कारणावरून भाडन झाले होते. याबाबत त्यांच्याविरोधात अदखलपात्र (एन.सी) गुन्हा दाखल आहे. त्यावेळी खासगी व्यक्ती धनंजय अधिकारी याने सुरुवातीला तक्रारदार यांच्याकडे पोलिसांसाठी 25 हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तडजोडीअंती 16 हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. एसीबीने याची पडताळणी केली असता त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार धनंजय यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान धनंजय अधिकारी नेमका कोणत्या पोलिसांसाठी लाच मागत होता. तसेच त्याने यापूर्वीही असे प्रकार केले आहेत असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर पोलीस ठाण्यात याबाबत खमंग चर्चा सुरू आहे.