पुण्यातील धक्कादायक प्रकार ! महिलनं चक्क ‘प्रायव्हेट पार्ट’मध्ये सोनं लपवलं, झडती घेणारे अधिकारी ‘हैराण’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विदेशातून वस्तू आणण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. त्यामुळे लोकं कोणत्या मार्गाने वस्तू किंवा सोनं आणतील याचा काही नेम नाही. सोनं किंवा परदेशी चलनाची तस्करी करण्यासाठी तस्कर कोणत्या पद्धतीचा अवलंब करतील याचा थांगपत्ता पोलिसांना देखील लागत नाही. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने शेंगदाण्यात विदेशी नोटा लपवून आणल्या होत्या. आता तर एका महिलेने चक्क आपल्या शरीरातील खासगी भागात सोने लपवून आणले.

ज्यावेळी ही महिला पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली त्यावेळी तिला कस्टम डिपार्टमेंटने ताब्यात घेतले. तिची झडती घेताना तिने सोने लपवण्यासाठी ज्या प्रकारे शक्कल लढवली हे पाहून झडती घेणारे पोलीस देखील चक्रावून गेले. विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी तिने शरीरात लपलेलं सोनं अधिकाऱ्यांना सापडलं.

अधिकाऱ्यांनी सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली पकडलेल्या महिलेच्या खासगी भागातून (गुदाशय) सोन्याची बिस्किटे जप्त केली. या सोन्याच्या बिस्किटांची आंतरराष्ट्रीय बाजारात वीस लाख रुपये आहे. अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या महिलेचे नाव मरियम मोहम्मद सलीम शेख असून ती पुण्यात दुबईतून आली होती. विमानतळावर स्कॅन करताना अधिकाऱ्यांना तिचा संशय आल्याने तिला ताब्यात घेतले. यानंतर वैद्यकीय पथकाला पाचारण करून तिची तपासणी केली. त्यावेळी तिने खासगी भागात सोने लपवल्याचे समोर आले.

दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर सर्व प्रवाशांना पोलिसांनी सक्त ताकीद दिली आहे. तस्करी हा प्रकार बेकायदेशीर असल्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी अशा गोष्टी करू नयेत असा सल्ला दिला आहे.