Pune Ambegaon Crime | सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन जेष्ठ नागरिकाची आत्महत्या, आंबेगाव येथील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Ambegaon Crime | जमिनीच्या वादातून चुलत भावांनी मारहाण केल्याने आणि त्यांच्याकडून वारंवार होत असलेल्या त्रासाला वैतागून एका 58 वर्षीय व्यक्तीने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना 4 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आंबेगाव बुद्रुक येथील कुटुंब सोसाटीच्या एफ विंग येथे घडली. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Suicide Case)

कुलदीप चंदरराव पिसाळ (वय- 58 रा. आंबेगाव बुद्रुक) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी कुलदीप यांची पत्नी उज्वला कुलदीप पिसाळ (वय-58) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) शुक्रवारी (दि.23) फिर्याद दिली आहे. यावरुन मृत कुलदीप यांचे चुलत भाऊ संजय हिंदुराव पिसाळ, राजेंद्र हिंदुराव पिसाळ, मनोज हिंदुराव पिसाळ (सर्व रा. मु.पो. ओझर्डे ता. वाई जि. सातारा) यांच्यावर आयपीसी 306, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.(Pune Ambegaon Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीची मूळगावी शेत जमीन असून चुलत भावासोबत वाद सुरु आहेत. चुलत भाऊ जमीनीच्या वादातून कुलदीप यांना वारंवार त्रास देत होते. दरम्यान त्यांना मारहाण देखील करण्यात आली होती. चुलत भावांकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून फिर्यादी यांचे पती कुलदीप यांनी राहत्या घराच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी तीन जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Executive Engineer Kiran Deshmukh Suspended | पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख निलंबित, जाणून घ्या कारण

Pune Navale Bridge Accident | पुणे: नवले पुलाखाली विचित्र अपघात; 8 ते 9 वाहने एकामेकांना धडकली (Video)

PM Narendra Modi In Yavatmal | पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारीला यवतमाळमध्ये, लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता

Sanjay Raut On BJP | राऊतांचा मोठा दावा, दोन्ही गटांना नड्डांनी सांगितले की, ”धनुष्यबाण, घड्याळाला लोक मतदान करणार नाहीत, त्यामुळे…”

Pune NCP News | प्रशांत जगताप यांच्यासह शरद पवार गटाच्या 9 जणांवर गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण (Videos)

बसची वाट पहात थांबलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, हडपसर येथील प्रकार